एक्स्प्लोर

PMAY | DHFL वर  CBI ने दाखल केला गुन्हा, 1880 कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप

DHFL ने खोटी शाखा काढून 2.60 लाख  बनावट खात्यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेतील (PMAY)  1880 कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप  CBI ने ठेवला आहे. 

मुंबई : डिएचएफएलने 2.60 खोट्या गृह कर्ज खात्यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेमध्ये मोठा घोटाळा केला आणि त्या माध्यमातून सरकारकडून 1880 कोटी रुपयांचे व्याज अनुदान लाटल्याचा आरोप ठेवत सीबीआयने डीएचएफएलच्या मालकांवर गुन्हा नोंद केला आहे. 

डीएचएफएलचे कपिल वधवान आणि धिरज वधवान यांच्या विरोधात सीबीआयने सरकारचे अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी मुंबईतील बांद्रा येथे एक डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून 14,046 कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेचे खोटी कर्ज खाती तयार केली. ज्यांच्या नावावे खाती काढण्यात आली होती त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आलं. 

कपिल वधवान आणि धिरज वधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित मनी लॉन्ड्रिगच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 1,887 कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी त्यांनी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

सीबीआयने सांगितल्या प्रमाणे, डिसेंबर 2018 पर्यंत डीएचएफएलने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 539.40 कोटी रुपयांचे अनुदान असलेली 88,651 खोटी कर्ज प्रकरणं करण्यात आली. 2007 ते 2019 या दरम्यान खोट्या कर्ज खात्यांच्या माध्यमातून 14,046 कोटी रुपयांची 2.60 लाख खोटी गृह कर्ज खाती तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही खाती मुंबईतील बांद्रा येथील अशा शाखेत काढण्यात आली जी बँक कधीच अस्तित्वातच नव्हती. 

पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. 2015 साली सुरु करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून गरीबांनी पक्की घरे उपलब्ध करुन देण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला आणि झोपडपट्टी धारकांना पक्की घरे बांधून देण्याचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या : 



आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, 6457 बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसूली, पण 22 कोटी खाणाऱ्या पुरुषांना 'सूट'
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, 6457 बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसूली, पण 22 कोटी खाणाऱ्या पुरुषांना 'सूट'
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 2 टक्के वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरु, पगार किती वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 2 टक्के वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरु, पगार किती वाढणार?
मोठी बातमी: इथेनॉलच्या नियमांसंदर्भात सरकारनं घेतला मोठा निर्णय, महागडा विमान प्रवास होणार स्वस्त 
मोठी बातमी: इथेनॉलच्या नियमांसंदर्भात सरकारनं घेतला मोठा निर्णय, महागडा विमान प्रवास होणार स्वस्त 

व्हिडीओ

Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report
Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
Embed widget