नवी दिल्ली: भारतातील दुचाकी विभाग अजूनही दुसऱ्या कोविडच्या लाटेतून पूर्णपणे सावरु शकलेला नाही आणि तोच युद्धामुळे होणारी इंधनाची वाढ यामुळे जवळजवळ सर्व दुचाकी उत्पादकांनी डीलर्सकडे त्यांच्या घाऊक पुरवठ्यात घट केली आहे. यामध्ये Hero MotoCorp, Honda Motorcycle and Scooter India (HMSI), TVS मोटर, बजाज ऑटो, रॉयल एनफिल्ड आणि सुझुकी मोटरसायकल यांसारख्या उत्पादकांनी मार्च 2022 मध्ये डीलर्सना पाठविण्यात येणाऱ्या मालामध्ये 21 टक्क्यांहून अधिक घसरण पाहिली आहे अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने ( FADA) दिली आहे.


या सर्वांना 22 मार्च रोजी एकूण 11,38,561 युनिट्सचा पुरवठा करण्यात जरी यश मिळवलेलं असलं तरी मागील वर्षी याच कालावधीत 14,43,320 इतकं होतं. यामध्ये टीव्हीएस मोटरने सर्वात कमी 2.57 टक्क्यांची घट नोंदवली आहे आणि मार्च 2022 मध्ये 2,02,155 च्या तुलनेत गेल्या महिन्यात 1,96,956 युनिट्स पाठवले होते. दुसरीकडे, बजाज ऑटोच्या सर्व देशांतर्गत उत्पादकांमध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि मार्च 2022 मध्ये एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत केवळ 40.97 टक्के कमी वाहने पाठवण्यात यशस्वी झाली होती.




हिरो मोटोकॉर्पने या वर्षी मार्चमध्ये 4,15,764 युनिट्स पाठवले होते, जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 23.62 टक्क्यांनी घसरले आहे. कंपनीने मार्च 2021 मध्ये 5,44,340 वाहने पाठवली होती. HMSI ने देखील 21.64 टक्‍क्‍यांची घसरण पाहिली आहे आणि मार्चमध्ये केवळ 3,09,549 युनिट्सची डिलिव्हरी केली होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 3,95,037 होती.


रॉयल एनफिल्ड आणि सुझुकी मोटरसायकलने अनुक्रमे 58,477 आणि 50,734 युनिट्स वितरित केल्या आहेत. रॉयल एनफिल्डमध्ये जवळपास 3 टक्क्यांची घसरण दिसली, तर सुझुकीने याच कालावधीत 15.76 टक्क्यांनी घट नोंदवली. 


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI