EV Bikes : मार्च महिन्यात लाँच झाल्या या इलेक्ट्रीक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्टे
Okinawa Okhi 90: यामध्ये 3.6kWh लिथियम-आयन बॅटरी आणि 3.8kW मोटर आहे. स्पोर्ट्स मोडमध्ये टॉप स्पीड 90kmph इतका वेग आहे. तर, इको मोडमध्ये 60kmph इतका वेग आहे. Okhi 90 एका चार्जवर 160 किमीपर्यंत प्रवास करू शकते असा कंपनीने दावा केला आहे. दिल्लीत त्याची किंमत 1.03 लाख रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Apptriumph tiger Sport 660 या बाईकमध्ये 660 cc इंजिन आहे. या इंजिनमुळे 10,250 rpm वर 81 PS/80 bhp (59.6 kW) पॉवर आणि 6,250 rpm वर 64 Nm टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. कंपनी बाईकसोबत 2 वर्षांची अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी देत आहे. या बाईकची किंमत 8,95,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. बाजारात या बाईकची स्पर्धा Kawasaki Versys 650 आणि Suzuki V-Storm 650 XT सोबत आहे.
Oben Rorr ची किंमत 1.25 लाख रुपये आहे. ही बाइक एका पूर्ण चार्जिंगमध्ये 200 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते असे कंपनीने म्हटले आहे. या बाइकची बॅटरी फक्त दोन तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. बाईकची प्री-बुकिंग 18 मार्चपासून सुरू झाली आहे. फक्त 999 रुपयांमध्ये कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटमधून बुकिंग करता येऊ शकते.
Royal Enfield Scram 411 ही बाईक हिमालयन अॅडव्हेंचर बाइकवर आधारीत आहे. नव्या स्क्रॅम 411 मध्ये 411 CC सिंगल-सिलेंडर, SOHC, एअर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 24.3 एचपी पॉवर आणि 32 एनएमचा टॉर्क जनरेट करतात. नवीन रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 411 ची किंमत भारतात 2.03 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
Ducati Panigale V2: या बाइकमध्ये 955 सीसी क्षमतेचे ट्ववीन सिलेंडर इंजिन आहे. हे 955 सीसी ट्वीन-सिलेंडर इंजिन 10,750 आरपीएमवर कमाल 155 एचपी इतकी पॉवर आणि 9000 आरपीएमवर कमाल 104 Nm टॉर्क जनरेट करतात. याची किंमत 21.3 लाख रुपये (एक्स-शो रूम) इतकी आहे.