Triumph Tiger Sport 660 : तुम्हालासुद्धा बाईक रायडिंगची आवड असेल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकतीच ट्रायम्फ स्पोर्ट्स बाईक इंडियाने आपली बहुप्रतिक्षित टायगर स्पोर्ट 660 (Triumph Tiger Sport 660) अॅडव्हेंचर भारतात लॉन्च केली आहे. यासाठी बुकिंग सुरू झाले आहेत. कंपनीने 50,000 रुपयांच्या टोकन रकमेवर नवीन मॉडेलचे ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे. मात्र, या बाईकची डिलिव्हरी अजून सुरू झाली नसून, एप्रिल महिन्यात बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. या स्पोर्ट बाईकच्या फीचर्समध्ये तुम्हाला आणखी काय काय पाहायला मिळेल ते जाणून घ्या. यामध्ये एलईडी हेडलाइट्स, ब्लूटूथ-रेडी TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, दोन राइडिंग मोड आणि ABS यांचा समावेश आहे.


ट्रायडेंट 660 प्रमाणे, नवीन टायगर स्पोर्ट 660 देखील राइड-बाय-वायर टेक्नॉलॉजी आणि पाऊस आणि रस्ता या दोन रायडिंग मोडसह येईल. यामध्ये कनेक्टिव्हिटी फीचरही उपलब्ध असेल. बाईक माय ट्रायम्फ कनेक्टिव्हिटी सिस्टमशी देखील जोडली जाऊ शकते. यात स्विच करण्यायोग्य ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 8,95,000 रुपये आहे. बाजारात त्याची स्पर्धा Kawasaki Versys 650 आणि Suzuki V-Storm 650 XT शी होण्याची शक्यता आहे.


कंपनीचा असा दावा आहे की, या बाईकची रेंज 16,000 किमी आहे. Triumph Tiger Sport 660 ला 660 CC इंजिन मिळेल, जे 10,250 rpm वर 81 PS/80 bhp (59.6 kW) पॉवर आणि 6,250 rpm वर 64 Nm टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. कंपनी बाईकबरोबर दोन वर्षांची अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी देत ​​आहे.


टायगर स्पोर्ट 660 तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. कोरोसी रेड-ग्रेफाइट, ल्युसर्न ब्लू-सॅपायर ब्लॅक आणि ग्रेफाइट-सॅपायर ब्लॅक अशा तीन कलरमध्ये ही बाईक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 40 पेक्षा जास्त अॅक्सेसरीज समाविष्ट असलेल्या अॅक्सेसरीज पॅकेजसह देखील येते.


Triumph कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टायगर स्पोर्ट 660 चे जागतिक बाजारात पदार्पण केले होते. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी, कंपनीने आपल्या भारतीय वेबसाइटवर नवीन बाईक लवकरच लॉन्च करणार असे सांगितले होते. अखेर ही बाईक भारतात लॉन्च झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI