मुंबई : राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला झालेल्या भाषणानंतर पुण्यात मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीदवरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसेने हनुमान चालीसा लावला. पुण्यातील माजीद अमीन शेख वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष असून त्यांनी राजीनामा दिला
मागील काही दिवसापासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे. /e कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या पत्रात दिली आहे. माजिद शेख यांच्यानंतरर अनेक मनसे मुस्लिम कार्यकर्ते राजनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही. या मशिदी आणि मदरशांमध्येच घातपाती कारवाया करणारे दडले आहेत. याविषयी माहिती मिळाली तर तुम्हाला धडकी भरेल, असे राज ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या :
Sandeep Deshpande : शिवसेना राष्ट्रवादीची 'ढ' टीम; आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मनसेचा पलटवार
Jitendra Awhad : मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना आव्हान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha