एक्स्प्लोर

नववर्षाच्या तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; एक लिटरसाठी किती पैसे मोजाल?

Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती काय?

Petrol Diesel Price Today 3rd January 2023: देशातील इंधनाचे दर तेल कंपन्यांनी जारी केले आहेत. आजच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल (Crude Oil Price in International Market) बोलायचं झालं, तर ब्रेंट क्रूड ऑईल, डब्ल्यूटीआयच्या किंमतीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. तसेच, देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) देखील 227 दिवसांनंतरही जैसे थेच आहेत. यापूर्वी 22 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करण्यात आला होता. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या सरासरी किमतीत 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Price Today 3rd January : 2023 मध्ये कच्चं तेल स्वस्त होणार? 

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जग कोरोनाच्या धास्तीखाली जगतंय. त्याचप्रमाणे, जगावर आर्थिक मंदीचं सावटही आहे. त्यामुळे नव्या वर्षात कच्च्या तेलाच्या दरांत काहीशी वाढ पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 30 अर्थशास्त्रज्ञ आणि विश्लेषकांनी सर्वेक्षणातून भाकीत केलं आहे की, 2023 मध्ये ब्रेंट क्रूड सरासरी 89.37 डॉलर प्रति बॅरल असेल, जे सध्याच्या 85.91 डॉलर प्रति बॅरल आणि 93.65 डॉलर सामान्य किंमतीपेक्षा फक्त 4 टक्के जास्त आहे. 

2022 मध्ये ब्रेंटची किंमत सरासरी 99 डॉलर प्रति बॅरल होती. दरम्यान, तज्ञांनी 2023 मध्ये यूएस क्रूड सरासरी 84.84 डॉलर प्रति बॅरल राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या महिन्याच्या 87.80 डॉलरपेक्षा कमी आहे. रॉयटर्स पोल गेल्या काही आठवड्यांपासून तेलावरील तेजीच्या विश्लेषणाचा विरोध करत आहे. ज्यात बँक ऑफ अमेरिकाकडून 90 डॉलर प्रति बॅरल अंदाज आणि Ninepoint Partners LP कडून 100 डॉलर प्रति बॅरल अंदाज समाविष्ट आहे.

मे महिन्यापासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतीत विक्रमी घसरण होत असताना सर्वांच्या नजरा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे लागल्या होत्या. पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत घट होणार का? याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं होतं. पण आजही भारतील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

21 मे रोजी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. सरकारनं उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात केल्यानं देशभरात पेट्रोल 9 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर दरांत कोणताही बदल झालेला नाही. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget