Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण, ग्राहकांना दिलासा नाहीच; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असताना दुसरीकडे देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...
![Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण, ग्राहकांना दिलासा नाहीच; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर Petrol Diesel Price know about today petrol diesel price today 3rd December 2022 check latest fuel price Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण, ग्राहकांना दिलासा नाहीच; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/474b94b090f49457830cf0acb39f520b1670037872265290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण (Crude Oil Price) सुरूच आहे. तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेक प्लस या संघटनेची बैठक पार पडणार असून या बैठकीत पुढील वर्षाचे 2023 मधील कच्च्या तेलाच्या उत्पादनाबाबत (Crude Oil Price Production) निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात काहीसे अस्थिरतेचे वातावरण दिसत आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावरही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय इंधन कंपन्यांनी पुन्हा आज इंधन दर जाहीर केले असून त्यात कोणताही बदल झाला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा 85.57 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 79.98 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. मागील महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळण दिसून आली होती. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या घरात पोहचले होते.
कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीचा फायदा भारतीय ग्राहकांना होताना दिसत नाही. जवळपास सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने इंधनावरील करात कपात केली होती. त्यानंतर इंधन दर स्थिर आहेत. एप्रिल महिन्यात इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे 80 पैशांची दरवाढ केली होती.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
देशातील प्रमुख शहरातील दर
> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरो
पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)