एक्स्प्लोर

गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी आधी पेट्रोल-डिझेलचे दर चेक करा; एका क्लिकवर पाहा तुमच्या शहरांतील किमती

Petrol Diesel Price Today : आजही 213व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत, जाणून घ्या झटपट किमती.

Petrol Diesel Price, 25 December 2022: महागाईच्या गर्तेत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा. आज ख्रिसमसचा (Christmas) दिवस. जगभरासह भारतातही मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा केला जातो. अशातच ख्रिसमसच्या दिवशी तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही. आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सतत घसरण होत असताना भारतीय तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today) जाहीर केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 

तेल कंपन्यांनी रविवारी (25 December 2022) पेट्रोल-डिझेलचे दर (25 December 2022) स्थिर ठेवले असले तरी, आज सलग 213वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 

गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्यानंतर पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सध्या WTI क्रूड प्रति बॅरल 80 डॉलर आणि ब्रेंट क्रूड 85 डॉलर प्रति बॅरल जवळ पोहोचलं आहे. जुलै 2008 नंतर यावर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचल्या. तेव्हापासून, 46 टक्क्यांच्या घसरणीसह, ते प्रति बॅरल 76 डॉलरच्या जवळ व्यापार करत आहे. ही या वर्षातील सर्वात कमी पातळी आहे. कच्च्या तेलाचा लिटर आणि रुपयांच्या संदर्भात अंदाज लावला तर 9 महिन्यांत किंमत 33 रुपयांहून अधिककमी झाल्या पाहिजेत. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट झालेली नाही.

यापूर्वी 21 मे रोजी सरकारनं पेट्रोल डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट झाली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओदिशा आणि केरळ सरकारनंही व्हॅटमध्ये कपात केली होती.

देशातील महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर विकलं जातंय. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 08 December 2024Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 8 डिसेंबर 2024  : ABP MajhaNana Patole Full PC : आम्ही विधानसभेतील आणि रस्त्यावरीलही लढाई लढू - पटोलेEknath Shinde Full PC : घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाहीत; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
Ind vs Aus 2nd Test : रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...
रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...
Eknath Shinde EVM: यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं नाहीतर.... रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला
आता ईव्हीएमचं रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
Embed widget