वैयक्तिक संपत्तीबाबत अर्थपूर्ण माहिती, आर्थिक साक्षरतेसाठीची सुरुवातीपासूनची मार्गदर्शिका
Financial Literacy : बजेटिंग म्हणजे आर्थिक नियोजनाचा पाया. यात आपल्या उत्पन्न आणि खर्चावर लक्ष ठेवणे समाविष्ट असते, जेणेकरून आपण आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत जीवन जगू शकतो.

Financial Literacy : असे म्हणतात की 'वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा'. पण पैसा वाचवणे ही एक कला आहे आणि ती कला शिकणे आता कठीण राहिलेले नाही. वैयक्तिक वित्त हे असे एक क्षेत्र आहे जे प्रत्येकाने शिकलेच पाहिजे. त्यामुळे अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत चाललेल्या आर्थिक जगात आपले जीवन अधिक सुसह्य आणि आरामदायक होईल. सर्वप्रथम, आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ पैशाचे व्यवस्थापन नव्हे, तर आपल्या आर्थिक भविष्यास सुरक्षित करणारे निर्णय घेणे म्हणजे आर्थिक साक्षरता. आपण आपल्या करिअरची सुरुवात करत असाल किंवा आपल्या वित्तीय गोष्टींवर नियंत्रण मिळवू इच्छित असाल, तर वैयक्तिक वित्तव्यवस्थेचा मजबूत पाया घालणे आपल्याला आपल्या ध्येयांची पूर्तता करण्यासाठी सक्षम बनवते.
आर्थिक साक्षरता का महत्त्वाची आहे?
एक आर्थिकदृष्ट्या साक्षर व्यक्ती आपल्या पैशाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये बाळगते. त्यामुळे तो जास्त खर्च, अपुरी बचत किंवा चुकीच्या गुंतवणुकीसारख्या सर्वसाधारण आर्थिक चुका कधीच करणार नाही. त्याच्या आर्थिक संकल्पना नेहमीच त्याला दीर्घकालीन ध्येयांसाठी योजना आखण्यास, आपत्कालीन परिस्थितींना हाताळण्यास आणि अधिक सुरक्षित व तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करतील.
या गोष्टी आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करतात. त्यामुळे व्यक्ती समाधानी जीवन जगू शकते, आपली स्वप्ने साकार करण्यावर लक्ष केंद्रित करू शकते आणि अचानक आलेल्या खर्चांना तोंड देण्यासाठी किंवा पैशांबाबत ताण न घेता स्वत:ला आणि आपल्या प्रियजनांना आधार देऊ शकते.
बजेटिंग आणि खर्च व्यवस्थापन
अमेरिकन लेखक विल्यम फेदर यांनी योग्यच म्हटले आहे, “बजेट म्हणजेच अंदाजपत्रक आपल्याला काय परवडत नाही हे सांगते, पण ते ते विकत घेण्यापासून आपल्याला रोखत नाही.”
बजेटिंग म्हणजे आर्थिक नियोजनाचा पाया. यात आपल्या उत्पन्न आणि खर्चावर लक्ष ठेवणे समाविष्ट असते, जेणेकरून आपण आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत जीवन जगू शकतो. एक नीट रचनाबद्ध बजेट आपल्याला कर्ज टाळण्यास आणि आर्थिक उद्दिष्टांना प्राधान्य देण्यास मदत करते. आपल्या खर्चांची गटवारी करून सुरुवात करा. जसे की अत्यावश्यक खर्च (भाडे आणि वीजबिल), बचत आणि ऐच्छिक खर्च (उदाहरणार्थ हॉटेलिंग). खर्चाचा अंदाज येण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेटिंग टूल्स आणि अॅप्सचा वापर करा आणि आपल्या खर्चाच्या सवयींबाबत प्रत्यक्षातील रिअल-टाइम माहिती मिळवा. यामुळे आपल्या आर्थिक आयुष्यात शिस्त येईल आणि विवेकबुद्धीने निर्णय घेण्यास मदत होईल. निश्चिंत राहा, जे तुम्हाला एकेकाळी परवडण्यासारखे वाटले होते, ते तुम्ही नक्कीच खरेदी करू शकाल.
बचत आणि गुंतवणूक
"पैसा वाचवा आणि मग बघा; पैसा तुम्हाला वाचवेल". बचत ही आर्थिक शिक्षणातील एक सुरुवातीची पायरी आहे. ती संपत्ती निर्मितीचा पाया घालते, तर गुंतवणूक तुमच्या बचतीत काळाच्या ओघात वाढ घडवून आणते. एखाद्याने किमान तीन ते सहा महिन्यांच्या खर्चाएवढी आपत्कालीन बचत तयार केली पाहिजे. एकदा ती तयार झाली की, म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, आणि फिक्स्ड डिपॉझिट्ससारख्या गुंतवणूक पर्यायांचा अभ्यास करा. त्यायोगे दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. थोडक्यात, लवकर सुरुवात करा, सातत्य ठेवा आणि चक्रवाढीच्या शक्तीचा अनुभव घ्या.
क्रेडिट जागरूकता
क्रेडिटचे चांगले ज्ञान असणे शाश्वत मजबूत आर्थिक स्थितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे सर्वज्ञात आहे की तुमचा क्रेडिट स्कोअर तुमचं कर्ज घेण्याचं सामर्थ्य आणि व्याजदर यावर परिणाम करतो. त्यामुळे, एक सराव म्हणून, वेळेवर बिल भरणे, जास्त कर्ज घेणे टाळणे आणि तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासणे या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. शेवटी, तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30% च्या खाली ठेवणे आवश्यक आहे. त्यातून तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल.
विमा नियोजन
अमेरिकन अभिनेता बेन फेल्डमन यांनी एकदा म्हटले होते, “लाईफ इन्शुरन्स हे एकमेव साधन आहे जे पैशांची नाणी घेतात आणि डॉलर्सची हमी देतात.” विम्यातील थोडीशी गुंतवणूक एखाद्याला अनपेक्षित आर्थिक संकटांपासून वाचवू शकते कारण ते उत्कृष्ट परतावा हमी देतं. आरोग्य, जीवन आणि मालमत्ता विमा हे तुमची संपत्ती आणि तुमचे प्रियजन यांना अनपेक्षित घटनांपासून सुरक्षित ठेवतात. तुम्हाला केवळ तुमच्या गरजांचे मूल्यांकन करावे लागेल आणि पुरेसे संरक्षण देणाऱ्या व्यापक योजना निवडाव्या लागतील. प्रत्येकाचा आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी आरोग्य आणि टर्म लाईफ इन्शुरन्स असलाच पाहिजे.
निवृत्ती नियोजन
निवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टींचा शेवट नाही. ती काहीतरी सुंदर गोष्ट सुरू होण्याची संधीही असू शकते. मात्र, हे साध्य करण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. निवृत्तीचं नियोजन लवकर सुरू झालं पाहिजे, जेणेकरून पुढील आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) यांसारख्या निवृत्ती योजनांमध्ये योगदान द्या आणि दीर्घकालीन वाढ देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करा. तुम्ही जितकी लवकर सुरुवात कराल, तितका तुमच्या पैशाला वाढीचा अधिक वेळ मिळेल. काम करत असलेल्या कंपनी, कार्यालयाने दिलेल्या समतुल्य निवृत्ती योगदानाचा लाभ घ्या, कारण ते मुळात मोफत पैशासारखेच असते.
तात्पर्य -
आर्थिक साक्षरता हा एक प्रवास आहे, अंतिम ठिकाण नाही. बजेटिंग, बचत, गुंतवणूक, क्रेडिट व्यवस्थापन, विमा आणि निवृत्ती नियोजन या गोष्टींचे मूलभूत ज्ञान मिळवल्याने तुम्ही दीर्घकालीन आर्थिक यशासाठी तयार होता. सतत माहिती घेत राहा, व्यावसायिक सल्ला घ्या आणि तुमचे आर्थिक धोरण अधिक प्रभावी बनवा. जितके जास्त तुम्ही जाणून घ्याल, तितके चांगले तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ शकाल आणि तुमची ध्येयं साध्य करू शकाल.
Disclaimer : This article is a featured article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live do not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article/advertisement and/or views expressed herein. Reader discretion is advised.























