State Bank Of India : SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! आजपासून बँकेने केला मोठा बदल
State Bank Of India : एसबीआयने आजपासून बदल केलेल्या नियमानुसार एफडी म्हणजे मुदत ठेवीवर चांगले व्याज मिळणार आहे. बँकेच्या या बदलामुळे देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
State Bank Of India FD Rates : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) मुदत ठेव (FD) ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या व्याजदरात बदल केले आहेत. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मुदत ठेवीवरील व्याज दरात बदल करण्यात आले आहेत. बँकेचे हे बदल आज म्हणजे 10 मेपासून लागू होणार आहेत. बँकेच्या या बदलामुळे देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
एसबीआयकडून ग्राहकांना सात दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची सुविधा देण्यात येते. या सुविधेनुसार ग्राहकांना त्यांना आवश्यक असेल तेवढ्या वेळा एफडी करता येणार आहे. या एफडीवर ग्राहकांना तीन टक्के ते 4.5 टक्के व्याजाचा लाभ दिला जात आहे.
जाणून घेऊया एफडीवरी व्याजाचे नवे दर
एसबीआयने आजपासून बदल केलेल्या नियमानुसार एफडी म्हणजे मुदत ठेवीवर चांगले व्याज मिळणार आहे. बँकेच्या नियमानुसार मुदत ठेव जेवढ्या जास्त कालावधीची असेल तेवढे त्यावर जास्त व्याज मिळेल.
- 7 ते 45 दिवस - तीन टक्के
- 46 ते 179 दिवस - 3.5 टक्के
- 180 ते 210 दिवस - 3.5 टक्के
- 211 ते एक वर्ष - 3.75 टक्के
- 1 वर्ष ते 2 वर्षे - 4 टक्के
- 2 वर्षे ते 3 वर्षे - 4.25 टक्के
- 3 वर्षे ते 5 वर्षे - 4.5 टक्के
- 5 ते 10 वर्षे - 4.5 टक्के
कोणत्या ग्राहकांना होणार फायदा?
एसबीआयच्या ज्या ग्राहकांनी दोन कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली आहे. अशा ग्राहकांना आजपासून जास्त व्याजाचा लाभ मिळणार आहे. सात ते 45 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीसाठी पूर्वीप्रमानेच व्याज मिळणार आहे. बँकेने आजपासून केलेले बदल यासाठी लागू होणरा नाहीत. तर 46 दिवसांपासून 149 दिवसांपर्यंतच्या FD रेटमध्ये 50 पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अलीकडेच पॉलिसी रेटमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआयने अचानक रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.