SBI Interest Rate : SBI ने ग्राहकांना दिला मोठा दिलासा; घेतला 'हा' निर्णय
SBI Interest Rate : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
SBI Interest Rate : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने दोन कोटी व त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या Domestic Bulk Term Deposits वर व्याज दर वाढवला आहे. बहुतांशी Domestic Bulk Term Deposits वर 40-90 बीपीएसची वाढ केली आहे. नवीन व्याज दर आजपासून लागू करण्यात आली आहेत. रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरात 40 बीपीएसची वाढ केली होती. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याज दर वाढवण्याची घोषणा केली आहे.
बँकेने सात दिवसापासून ते 45 दिवसाच्या मुदतीसाठी असलेल्या टर्म डिपॉझिटवर तीन टक्के व्याज दर ठेवला आहे. 46 ते 179 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी व्याज दर वाढवून 3.50 टक्के केला आहे. तर, 180 ते 210 दिवसांच्या मुदतीसाठी व्याज दरात 40 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. पूर्वी हा दर 3.1 टक्के इतका होता. आता, 3.5 टक्के झाला आहे. 211 दिवसापासून ते एक वर्षापर्यंतच्या कालावधीच्या टर्म डिपॉझिटवर 3.75 टक्के व्याज दर होणार आहे.
मार्च महिन्यात केली होती वाढ
स्टेट बँकेने याआधीदेखील एक ते दोन वर्षांसाठी असलेल्या डिपॉझिट्सवरील व्याज दरात 3.6 टक्क्यांहून वाढ करत 4 टक्के दर केला होता. अशाच प्रकारे दोन वर्ष ते तीन वर्षासाठीच्या किमान कालावधीसाठीचा व्याज दर 4.25 टक्के झाला.
आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्राने व्याज दर वाढवले
आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्राने 2 कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 390 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 30 बेसिस प्वाइंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, 23 महिन्याच्या मुदत ठेवीवर 35 बेसिस प्वाइंट्सची वाढ करण्यात आली आहे. नवीन व्याज 6 मे 2022 पासून लागू झाली आहे.
आयसीआयसीआय बँकेने देखील 2 कोटी ते 5 कोटींच्या मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही 5 मे 2022 पासून लागू झाली आहे.