Loan Offer : यंदाच्या दिवाळीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करायचीय? SBI ची भन्नाट ऑफर
SBI Consumer Durable Loan : सणासुदीत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन खरेदीसाठी भारतीय स्टेट बँक देणार कन्ज्युमर ड्युरेबल कर्ज, सविस्तर माहिती वाचा.
SBI Loan Offer : दिवाळी (Diwali 2023) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत तुम्हीही टीव्ही (TV), फ्रीज (Fridge), वॉशिंग मशीन (Washing Machine) किंवा मोबाईल फोन (Mobile Phone) घेण्याच्या विचारात असाल आणि त्यासाठी तुम्हाला मदत हवी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यंदाच्या सणासुदीला खरेदीसाठी तुम्ही एसबीआयच्या ऑफरला लाभ घेऊ शकता. तुम्ही भारतीय स्टेट बँक (State Bank of India) कन्ज्युमर ड्युरेबल कर्ज घेऊ शकता. यामध्ये तुम्ही आधीच बँकेचे प्री-अप्रूव्ड ग्राहक असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत ग्राहक टिकाऊ कर्ज (SBI Consumer Durable Loan) मिळू शकतं.
यंदाच्या दिवाळीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करायचीय?
भारतीय स्टेट बँक कन्ज्युमर ड्युरेबल लोनमध्ये तुम्हाला डेबिट कार्ड ईएमआय (SBI Debit Card EMI) सुविधा मिळते. या कर्जाती परतफेड करण्यासाठी तुम्हाला कालावधी तीन महिन्यांपासून ते 36 महिन्यांपर्यंत असतो. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्हाला यामध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.
भारतीय स्टेट बँक करणार मदत
SBI कडून मिळणारे ग्राहक टिकाऊ कर्ज ऑनलाइन EMI, पेमेंट गेटवे, एग्रीगेटरद्वारे इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड क्रेडेन्शियल प्रविष्ट करून निवडक ऑनलाइन व्यापार्यांकडून मिळू शकते. कर्जाची रक्कम व्यवहाराच्या रकमेइतकी असेल आणि अटी आणि शर्ती मान्य केल्यावर कर्ज खातं तयार होईल.
कर्जाची रक्कम आणि EMI कालावधी
- तुम्ही 3,000 ते 25,000 रुपये कर्ज घेतल्यास, तुम्हाला 3, 6, 9, 12 महिन्यांचा EMI पर्याय मिळेल.
- तुम्ही 25,000 ते 50,000 रुपयांचे कर्ज घेतल्यास, तुम्हाला 3, 6, 9, 12, 18, 24 महिन्यांत हप्ता परत करण्याचा पर्याय मिळेल.
- तुम्ही 50,000 ते 2,00,000 रुपयांपर्यंतचे ग्राहक टिकाऊ कर्ज घेतल्यास, तुम्हाला 3,6,9,12,18,24,30,36 महिन्यांच्या EMI चा पर्याय मिळेल.
कर्जावर किती व्याज आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक टिकाऊ कर्ज हे डेबिट कार्ड EMI कर्ज (SBI Debit Card) आहे. तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात की नाही हे तपासू शकता. SBI बँकेकडे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567676 वर DCEMI एसएमएस पाठवून ग्राहक त्यांची पात्रता आणि पात्र कर्जाची रक्कम जाणून घेऊ शकतात. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, SBI ग्राहक टिकाऊ कर्जावर सध्या 18.35 टक्के व्याज आकारत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :