Saving and Current Account Difference : देशात प्रत्येकाचंच बँक खातं आहे. तुम्हाला बहुतांश सरकारी योजनांचे (Government Schemes) लाभ बँक खात्यांद्वारेच मिळतात. बँकेत खातं उघडताना आपल्याला एक फॉर्म भरुन द्यावा लागतो. या फॉर्ममध्ये खातं उघडण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीची माहिती भरुन घेतली जाते. त्यामध्ये वैयक्तिक माहितीचाही समावेश असतो. त्यासोबतच फॉर्ममध्ये तुम्हाला कोणतं खातं उघडायचं आहे? सेव्हिंग की, करंट (Saving and Current Account) हेदेखील पाहिलं जातं. परंतु, अनेकजण सेव्हिंग अकाउंट म्हणजेच, बचत खातं उघडतात. याशिवाय, जेव्हाही आपण एटीएममधून (ATM) पैसे काढतो, त्यादरम्यान स्क्रिनवर खातं निवडण्याचा पर्याय देखील मिळतो. त्यावेळी तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे की, करंट अकाउंट हा पर्याय निवडावा लागतो. 


आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की, सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये (Difference Between Current and Saving Account)  काय फरक आहे. बहुतांश जणांना या दोन अकाउंट्समधील फरक माहीत नसतो. अशातच आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सेव्हिंग आणि करंट बँक अकाउंटमधील फरक सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार, बँक अकाउंट निवडण्यास मदत होईल. 


सेविंग अकाउंट काय आहे? 


सेविंग अकाउंट (Saving Account) बचत खातं असंही म्हटलं जातं. हे खातं सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत लाभदायक असतं. या खात्याद्वारे तुम्हाला पैशांची बचत करण्यास मदत होते. या खात्यात तुम्ही थोडेथोडे पैसे साठवू शकता. खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेवर तुम्हाला व्याजही मिळतं. हे खातं तुम्ही जॉईंट किंवा वैयक्तिक रित्या सुरु करु शकता. या अकाउंटवर खातेधारकांना 4 ते 6 टक्के व्याज दिलं जातं. सेविंग अकाउंटवर किती व्याज द्यायचं, याचा पूर्णपणे निर्णय बँकेकडून घेण्यात येतो. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना व्याजदरात काहीशी सूट मिळते.


करंट अकाउंट काय आहे? 


करंट अकाउंट  (Current Account) जास्त करुन व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतं. या खात्यातील बहुतांश व्यवहार सतत सुरू असतात. हे खातं नियमित व्यवहारांसाठी चांगलं मानलं जातं. खातेदार बहुतेक व्यावसायिक संस्था (Business Organization), फर्म इत्यादींचे असतात. या खात्यावर कोणतेही व्याज मिळत नाही.


सेविंग आणि करंट अकाउंटमध्ये अंतर काय? 


सेविंग अकाउंट सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अशातच करंट अकाउंट व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतं. सेविंग अकाउंटमध्ये व्याज मिळतं. परंतु, करंट अकाउंटमध्ये व्याज मिळत नाही. सेविंग अकाउंटमध्ये एका मर्यादेपर्यंतच तुम्ही ट्रान्जॅक्शन (Limited Transaction) करु शकता. अशातच करंट अकाउंटमध्ये ट्रान्जॅक्शन लिमिट (Transaction Limit) नसतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha