Persons with Multiple Bank Account : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँक अकाऊंट आहे. पण, अनेक वेळा आपल्याला एकापेक्षा जास्त अकाऊंट (Multiple Account) उघडावी लागतात. बऱ्याचदा नोकरदार व्यक्तींच्या बाबतीत असे घडते. कारण त्यांना नोकरी दरम्यान बदली करावी लागते किंवा बदली होते. अशा परिस्थितीत जागा बदलल्यामुळे ते अकाऊंट बंद करायला विसरतात. पण, एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट ठेवल्याने अनेक अडचणी निर्माण होतात हे तुम्हाला माहित नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 


बँकांच्या नियमांनुसार, 12 महिन्यांपर्यंत एखाद्या अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला नाही, तर बँक त्याला निष्क्रिय खात्याच्या (Inactive Account) श्रेणीत टाकते. त्यानंतर पुढील 24 महिन्यांत या अकाऊंटमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही तर बॅंक ते अकाऊंट बंद करते. अनेकांना यामुळे होणारे नुकसान समजत नाही. पण, या सर्व अकाऊंटमुळे तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची प्रक्रिया कठीण होते. त्याचबरोबर, तुमच्या CIBIL स्कोअरवरही याचा वाईट परिणाम होतो.


मिनिमम बॅलन्स (Minimum Balance Score) न ठेवल्यास होतो मोठा तोटा 


अनेक लोक पगार आणि सेविंग अकाऊंट वेगळे ठेवतात. त्यामुळे अनेक वेळा अकाऊंटमध्ये पैशांचा व्यवहार होत नाही. अशा स्थितीत बँक अकाऊंटला करंटमधून सेविंगमध्ये बदलतात. नंतर, अकाऊंटमध्ये किमान बॅलेन्स (Minimum Balance Score) पूर्ण न करण्याच्या अटीवर, बँक तुमच्यावर दंड देखील आकारू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे अकाऊंट लवकरात लवकर बंद करावे. अकाऊंट बंद केल्याने तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही.


अकाऊंट बंद करा


आजकाल तुम्ही जिथे अकाऊंट उघडता त्या प्रत्येक ठिकाणी तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डची माहिती घेतली जाते. अशा वेळी, अकाऊंट न वापरल्याने त्यावर लावण्यात आलेल्या दंडाचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होऊ शकतो. यासोबतच इन्कम टॅक्स भरण्याची प्रक्रियाही कठीण होते. त्यामुळे असे बँक अकाऊंट लवकरात लवकर बंद करण्याचा प्रयत्न करावा. बँक अकाऊंट लवकरच बंद करण्यासाठी, तुम्हाला डिलिंकिंग (Delinking) आणि बँक क्लोजिंग फॉर्म (Account Closure Form) सबमिट करावा लागेल. यानंतर, काही प्रक्रिया फॉलो केल्यानंतर, तुमचे अकाऊंट बंद होईल. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha