एक्स्प्लोर

Post Office Scheme : दररोज 50 रुपये गुंतवा अन् एका झटक्यात 35 लाखांचा परतावा मिळवा; काय आहे योजना?

Post Office Scheme : दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करा अन् तब्बल 35 लाखांचा परतावा मिळवा, जाणून घ्या शायकीय योजनेबाबत सविस्तर

Post Office Scheme : भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office Schemes) अनेक प्रकारच्या बचत योजना चालवतं. कोट्यवधी लोकांना पोस्टाच्या या योजनांचा चांगलाचा फायदा होत असल्याचं दिसत आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करुन अनेक गुंतवणूकदार चांगला परतावा मिळवत आहेत. त्यामुळे लोक पोस्ट ऑफिस स्कीममध्ये पैसे गुंतवतात. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणं जोखीममुक्त मानलं जातं. लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित आणि उत्तम परतावा असलेल्या योजनांमध्ये गुंतवायचे असतात. अशीच एक पोस्ट ऑफिस योजना म्हणजे, ग्रामसुरक्षा योजना. या योजनेसाठी तुम्ही दररोज फक्त 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. जाणून घ्या झटपट नक्की काय आहे ही योजना... 

कशी कराल गुंतवणूक? 

ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Rural Postal Life Insurance Schemes Program) कार्यक्रमाचा एक भाग आहे. ही विमा पॉलिसी 1995 मध्ये देशातील ग्रामीण लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतात. 

या योजनेतंर्गत 10 हजार रुपयांपासून  10 लाखांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. प्रीमियम भरण्यासाठी यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

परतावा कसा मिळणार? 

ग्राम सुरक्षा योजनेबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला या योजनेत दरमाह 1,515 रुपये म्हणजेच, दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करायची असेल, तर त्यांना तब्बल 35 लाखांचा परतावा मिळू शकतो. जर तुम्ही ग्रामसुरक्षा योजना वयाच्या 19व्या वर्षी घेत असाल, तर वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत तुम्हाला 1,515 रुपये प्रीमियम भरावं लागेल. 

कसा मिळवाल 35 लाखांचा परतावा? 

जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत ही योजना घेतली, तर तुम्हाला दरमहा 1463 रुपये आणि 60 वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा 1411 रुपये द्यावे लागतील. तुमचा एखादा प्रीमियम भरायचा चुकल्यास, तुम्ही तो पुढच्या 30 दिवसांच्या आत जमा करू शकता. जर तुम्ही या योजनेच्या परताव्यावर नजर टाकली तर, गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये, 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ मिळेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Indian Post: पोस्ट ऑफीसमध्ये 400 रुपये गुंतवा आणि व्हा एक कोटींचे मालक, जाणून घ्या सविस्तर 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, बानवकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, बानवकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Daryl Mitchell Ind vs Nz 3rd ODI : कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, बानवकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, बानवकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Daryl Mitchell Ind vs Nz 3rd ODI : कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
Ind vs Nz 3rd T20 Live Score : डॅरिल मिशेलने टीम इंडियाच्या गोलंदाजांना धू धू धुतले, ठोकले सलग दुसरे शतक! सामन्याची प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
डॅरिल मिशेलने टीम इंडियाच्या गोलंदाजांना धू धू धुतले, ठोकले सलग दुसरे शतक! सामन्याची प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
Embed widget