NPS Withdrawal Rules : राष्ट्रीय पेन्शन खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम बदलणार
NPS Withdrawal Rules Changing : 1 फेब्रुवारीपासून एनपीएससंदर्भात पैसे काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
National Pension System Withdrawal Rules : एनपीएस (NPS) धारकांसाठी म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (National Pension System) योजनेअंतर्गत खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीएस संदर्भातील महत्त्वाच्या नियमामध्ये बदल (NPS Withdrawal Rules Changing) होणार आहे. पुढील महिन्यापासून एनपीएसमधून (NPS Account) पैसे काढण्याच्या नियमात बदल होणार आहे. पीएफआरडीए (PFRDA) म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Pension Fund Regulatory and Development Authority) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 फेब्रुवारीपासून NPS खातेधारकांसाठी खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल (NPS Withdrawal Rules Changing) होणार आहे. आता खातेदारांना पुढील महिन्यापासून जमा केलेल्या रकमेपैकी फक्त 25 टक्के रक्कम काढता येणार आहे.
खात्यातून पैसे केव्हा काढता येतील?
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) 12 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, NPS खातेधारक मुलांचे शिक्षण, लग्नाचा खर्च, घर खरेदी, वैद्यकीय खर्च इत्यादींसाठी त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 25 टक्के रक्कम काढू शकतील. हा नवीन नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. याशिवाय तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी NPS खात्यातून पैसे काढता येतील.
NPS खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया काय?
- राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (National Pension System) खातेधारकाला त्याच्या खात्यातून पैसे काढायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कारणासह पैसे काढण्याची विनंती दाखल करावी लागेल.
- जर खातेधारक कोणत्याही आजाराने त्रस्त असेल, तर मास्टर परिपत्रकाच्या पॅरा 6(डी) अंतर्गत, त्याच्या कुटुंबातील सदस्याला आंशिक पैसे काढण्यासाठी पैसे काढण्याची विनंती सबमिट करण्याचा अधिकार आहे.
- पैसे काढण्याची विनंती दाखल करताना खातेदाराला पैसे काढण्याच्या कारण काय, याची माहिती द्यावी लागेल.
- यानंतर सीआरए म्हणजेच सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी या पैसे काढण्याच्या विनंतीची चौकशी करेल आणि त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाईल.
- सर्व माहिती बरोबर आढळल्यास, काही दिवसात खातेधारकाच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील.
NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी 'या' अटींची पूर्तता करणे आवश्यक
1. NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी, तुमचे खाते किमान 3 वर्षे किंवा त्याहून जुने असले पाहिजे.
2. काढलेली रक्कम खात्यात जमा केलेल्या निधीच्या एक चतुर्थांश पेक्षा जास्त नसावी.
3. एक ग्राहक फक्त तीन वेळा खात्यातून आंशिक रक्कम काढू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :