एक्स्प्लोर

Insurance Complaint: विमा कंपन्यांविरोधात सोशल मीडिया नव्हे 'या' ठिकाणी करा तक्रार!

Insurance Complaint: विमा कंपन्याबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोशल मीडियाऐवजी योग्य ठिकाणी तक्रार करणे आवश्यक आहे.

Insurance Complaint:  विमा कंपन्यांबाबत असलेल्या तक्रारींचा रोष अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त करतात. सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट लिहून संबंधित कंपनीला पोस्टमध्ये टॅग करतात. मात्र त्यांच्या समस्येचे निवारण होत नाही. काही पॉलिसीधारक विमा कंपनीच्या (Insurance Company) कॉल सेंटर्समध्ये संपर्क साधतात. त्या ठिकाणीदेखील इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) असल्याने अनेकदा प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे विमा कंपनीबद्दल काही समस्या असतील तर योग्य ठिकाणी दाद मागणे आवश्यक आहे. 

विमा दावा किंवा अन्य मुद्यांबाबत तक्रार कुठे करावी यांची माहिती अनेक विमाधारकांना नसते. त्यामुळे सोशल मीडियावर विमा कंपन्यांविरोधातील राग व्यक्त केला जातो. यातून विमा कंपनीकडून ग्राहकांकडे झालेले दुर्लक्ष लोकांसमोर येते आणि लोकांमध्ये काही वेळ चर्चा होते. मात्र, ठोस मार्ग निघत नाही. त्यामुळे विमा कंपन्यांबाबतची तक्रारी योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे. 

Insurance Ombudsman कडे मागा दाद

जर तुमच विमा कंपनी तुमच्या तक्रारीचे निवारण करत नसतील तर तुम्ही  Insurance Ombudsman कडे तक्रार करू शकता. त्यासाठी तुम्हाला Insurance Ombudsman कार्यालयात ग्रिव्हेन्स रिड्रेसल ऑफिसरकडे (GRO) तक्रार दाखल करावी लागेल.  policyholder.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला सर्व कंपन्यांच्या GRO अधिकाऱ्यांचे ई-मेल मिळू शकतात. तुम्ही त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रांसह तक्रार पाठवू शकता. तक्रार पाठवल्याची acknowledgement तुमच्याकडे ठेवा. 

विशेष म्हणजे Insurance Ombudsman तक्रार निवारण कक्ष हे पॉलिसीधारकाच्या ऐवजी इतर व्यक्ती, वकिलामार्फत आलेल्या तक्रारींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे फक्त पॉलिसीधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यावर भर दिला जातो. 

विमा कंपनीवर नाराज, तर IRDAI ला करा तक्रार

तक्रार दाखल केल्यानंतर 15 दिवसांत विमा कंपनीला तक्रारींचे निवारण करावे लागेल. जर, विमा कंपनीकडे केलेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नाही तर तुम्ही भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) ग्राहक विभागाकडे दाद मागू शकता. तुम्ही 155255 अथवा 18004254732 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता अथवा complaints@irdai.gov.in या ई-मेलवर तक्रार करू शकता. विमा कंपनीच्या विरोधातील तक्रारी 'बिमा भरोसा पोर्टल' (bimabharosa.irdai.gov.in) वर तक्रारी दाखल करू शकता. या ठिकाणी तुमच्या तक्रारीची सद्यस्थितीही जाणून घेता येईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget