Saving Scheme: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच मुदत ठेवी म्हणजे एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही एसबीआयमध्ये (SBI BABK) एफडी घेण्याची योजना आखत असाल, तर तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्ज टाइम डिपॉझिट खात्याच्या व्याजदर बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला एसबीआय मुदत ठेव व्याज दर आणि टाईम डिपॉझिट खात्याबद्दल सांगत आहोत. जेणे करून तुम्हाला तुमच्यानुसार योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल.


नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट खात्यात 6.7% पर्यंत व्याज उपलब्ध आहे


ही फक्त एक प्रकारची एफडी आहे. त्यात ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित परतावा मिळू शकतो. टाइम डिपॉझिट खाते 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 5.5 ते 6.7% व्याज दर देऊ करेल. यामध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक आहे. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.


पैसे किती वेळात दुप्पट होणार कुठे?


नॅशनल सेव्हिंग्ज टाइम डिपॉझिट खाते : यामध्ये जास्तीत जास्त 6.7% व्याज मिळतं, त्यामुळे नियम 72 नुसार, जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर पैसे दुप्पट होण्यासाठी 10 वर्षे 7 महिने लागतील.


एसबीआय एफडी : यामध्ये कमाल 5.4% व्याज मिळत आहे, त्यामुळे नियम 72 नुसार, जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर पैसे दुप्पट होण्यासाठी 13 वर्षे आणि 3 महिने लागतील.


5 वर्षांच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ


आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत या टाइम डिपॉझिट स्कीम आणि एफडीमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करून कोणीही कर सूट मिळवू शकतो. या अंतर्गत तुम्ही 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा लाभ घेऊ शकता.


72 चा नियम काय आहे?


वित्तविषयक हा विशेष नियम म्हणजे नियम 72. तज्ज्ञ हा सर्वात अचूक नियम मानतात, ज्याद्वारे हे ठरवले जाते की तुमची गुंतवणूक किती वेळात दुप्पट होईल. तुम्ही हे अशा प्रकारे समजू शकता की, जर तुम्ही बँकेची एखादी विशिष्ट योजना निवडली असेल, जिथे तुम्हाला वार्षिक 8% व्याज मिळते. अशा स्थितीत, तुम्हाला 72 च्या नियमानुसार 72 ला 8 ने भागावे लागेल. 72/8 = 9 वर्षे, म्हणजेच या योजनेतील तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील.


संबंधित बातम्या :