LIC IPO: गेल्या काही महिन्यांपासून एलआयसीच्या आयपीओबाबत चर्चा सुरु आहे. अखेर आता एलआयसीकडून आयपीओसाठी कागदपत्रे सेबीकडे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या 15 ते 20 दिवसात एलआयसीचा आयपीओ बाजारात येण्याची तयारी देखील येईल. पण एलआयसीचा आयपीओ मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला सहज एलआयसीचा आयपीओ मिळू शकतो. 


यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे जाणून घेऊया,


पहिली गरज
तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असणं गरजेचं आहे. कारण एलआयसीच्या पॉलिसी होल्डरसाठी आयपीओच्या सबस्क्रिप्शनमध्ये 10 टक्के कोटा राखीव असणार आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर तुम्हाला आयपीओ मिळण्याचा मार्ग सुकर होईल. कारण मोठे गुंतवणूकदार आणि ज्यांच्याकडे एलआयसीची पॉलिसी नाही असे गुंतवणूकदार या 10 टक्के कोट्यातून अर्ज करु शकत नाहीत. पण फक्त पॉलिसी असून चालणार नाही.


दुसरी गरज
तुमची पॉलिसी आणि तुमचे डिमॅट अकाऊंट हे तुमच्या पॅनला जोडलेलं असणं गरजेचं असणारे आहे. 28 फेब्रुवारीच्या आधी तुम्हाला तुमचे पॅन नंबर पॉलिसी आणि डिमॅट अकाऊंटशी जोडावे लागणार आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पॅन कसे जोडायचे. 


असं जोडा पॅन नंबर तुमच्या पॉलिसी आणि डिमॅट खात्याशी,


1. एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच licindia.in वर भेट द्या.
2. वेबसाईटच्या होमपेजवरच online pan refistration हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3. पुढे जाण्यापूर्वी तुमचे पॅन कार्ड, तुमच्या सर्व एलआयसी पॉलिसीचे नंबर, तुमच्या जवळ ठेवा.
4. Proceed या बटनावर क्लिक करुन पुढे जा.
5. link pan with your policy या पेजवर तुमच्या पॅनकार्डची माहिती भरा.
6. मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो वेबसाईटवर टाका.
7. आपले पॅनकार्ड पॉलिसीला लिंक झाले की नाही हे तुम्ही पुन्हा याच लिंकवर जाऊन तपासू शकता.


ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जेव्हा एलआयसीचा आयपीओ येईल तेव्हा तुम्ही तुमच्या डिमॅट खात्यावरुन त्याला अर्ज करु शकता आणि तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला एलआयसीचा आयपीओ मिळू शकतो.


संबंधित बातम्या: