Post Office Scheme: पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) ही एक सुपरहिट छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये एकरकमी ठेव तुम्हाला दरमहा उत्पन्नाची हमी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संयुक्त खाते उघडून जास्तीत जास्त लाभ घेता येतो. या योजनेत पती-पत्नीच्या संयुक्त खात्यातून दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते. यामध्ये फक्त एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. त्याची परिपक्वता 5 वर्षांची आहे. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळू लागेल. पोस्ट ऑफिस योजनेतील गुंतवणूक 100% सुरक्षित आहे. बाजारातील चढ उताराचा त्याचा परिणाम होत नाही.
POMIS: संयुक्त खात्यात 9 लाख जमा
पोस्ट ऑफिसच्या या योजनेंतर्गत एका खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात, तर संयुक्त खात्यात कमाल ठेव मर्यादा 9 लाख रुपये आहे. सध्या या योजनेवर ६.६ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. तुमची इच्छा असल्यास, तुमची एकूण मूळ रक्कम 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर परत केली जाईल. त्याच वेळी ते आणखी 5-5 वर्षांनी वाढविले जाऊ शकतं. दर 5 वर्षांनी तुमची मूळ रक्कम घेण्याचा किंवा योजना वाढवण्याचा पर्याय असेल.
पती आणि पत्नीचे मासिक उत्पन्न 4,950 रुपये
समजा, पती-पत्नीने संयुक्त खाते उघडलं आणि त्यात 9 लाख रुपये जमा केलं. त्यावर 6.6 टक्के दराने वार्षिक 59,400 रुपये व्याज मिळते. जर तुम्ही ते 12 महिन्यांत विभाजित केले तर तुम्हाला दरमहा 4,950 रुपये मिळतील. नियमांनुसार एमआयएसमध्ये दोन किंवा तीन लोकही संयुक्त खाते उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदाला समान दिले जाते. तुम्ही कधीही संयुक्त खातं एकाच खात्यात रूपांतरित करू शकता. तुम्ही एकाच खात्याचे संयुक्त खात्यात रूपांतर देखील करू शकता. खात्यात कोणतेही बदल करण्यासाठी, सर्व खाते सदस्यांना संयुक्त अर्ज द्यावा लागेल.
पोस्ट ऑफिसची मासिक गुंतवणूक योजना देशातील कोणताही नागरिक, मग तो प्रौढ असो वा अल्पवयीन, घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावानेही खातं उघडू शकता. जर मुलाचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्याचं खातं त्याच्या पालकांच्या वतीने किंवा कायदेशीर पालकाच्या वतीने उघडले जाऊ शकते. मुलाचे वय 10 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला स्वतःही खाते चालवण्याचा अधिकार मिळू शकतो.
खाते कसे उघडायचे?
एमआयएस खात्यासाठी, तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणं आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी असणे आवश्यक आहे. तुम्हाला 2 पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागतील. पत्त्याच्या पुराव्यासाठी, सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल वैध असेल. ही कागदपत्र घेऊन तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरावा लागेल. तुम्ही ते ऑनलाइनही डाउनलोड करू शकता. फॉर्म भरण्यासोबतच नामनिर्देशित व्यक्तीचे नावही द्यावे लागणार आहे. हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करावे लागतील.
एमआयएसमध्ये अकाली बंद करणं शक्य आहे. त्याचप्रमाणे ठेवीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकता. नियमांनुसार, एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, ठेव रकमेच्या 2% परत केले जातील. तुम्ही खाते उघडल्यानंतर 3 वर्षांच्या मुदतीपूर्वी कधीही पैसे काढल्यास, तुमच्या ठेव रकमेपैकी 1% रक्कम वजा केल्यावर परत केली जाईल.
महत्वाच्या बातम्या :
- Senior Citizen Special FD Scheme : 'या' दिग्गज बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली खास FD योजना, जाणून घ्या किती मिळणार व्याजदर
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेणाऱ्यांना एलआयसीचा इश्यू स्वस्त मिळणार
- Share Market : रशिया-युक्रेन वाद; शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha