LIC Investment : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. बाजारात अनेक विमा कंपन्या आल्यानंतरही देशात अजूनही एक मोठा मध्यमवर्ग (Middle Class) आहे, ज्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळात (Life Insurance Corporation) पैसे गुंतवणे आवडते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एलआयसीमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक (Money Investment) केल्याने कमी वेळात जास्त परतावा मिळतो. यासोबतच पैसे गमावण्याची जोखीम ही यामध्ये कमी असते. एलआयसी ग्राहकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना आणत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे धन रेखा योजना (LIC Dhan Rekha Policy). चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल...
काय आहे एलआयसी 'धन रेखा योजना'
एलआयसीच्या धन रेखा पॉलिसी ही प्रचंड फायदे देणारी पॉलिसी आहे (LIC Dhan Rekha Policy Benefits). या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे, तुम्हाला विम्याच्या रकमेचा एक भाग दर काही वेळानंतर परताव्याच्या (LIC Dhan Rekha Policy Return) स्वरूपात मिळेल. परंतु हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला पॉलिसी कायम कार्यरत स्थितीत ठेवणे अत्यंत आवश्यक असेल.
या लोकांना मिळेल पॉलिसीचा लाभ
या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 35 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे. त्याचबरोबर मुलेही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात. ज्यांचे वय 90 दिवसांपासून ते 8 वर्षे असावे. या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हे निवडू शकता परंतु, तुम्हाला या पॉलिसीमध्ये किमान 2 लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे पॉलिसीच्या काही भागासाठी आधी मिळालेले पैसे मॅच्युरिटीच्या वेळी एकूण रकमेतून कापले जाणार नाहीत. या योजनेत तुम्हाला सुमारे 125 टक्के विमा रक्कम परत मिळणार आहे.
पॉलिसीसाठी तुम्ही तीन टर्ममध्ये (Policy Term) गुंतवणूक करू शकता
यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार 20 वर्षे, 30 वर्षे आणि 40 वर्षांची गुंतवणूक करू शकता.
यासह तुमची प्रीमियम रक्कम तुम्ही किती काळासाठी किती गुंतवणूक करू इच्छिता यावर अवलंबून असते.
यासोबतच या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे तुमच्या प्लॅनच्या अर्ध्या टर्मसाठी प्रीमियम भरावा लागेल.
20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 10 वर्षे, 30 वर्षांसाठी 15 वर्षे आणि 40 वर्षांसाठी 20 वर्षे प्रीमियम भरावा लागतो.
तुम्ही प्रीमियम एकाच वेळेत पूर्ण पैसे भरू शकता, म्हणजेच सिंगल प्रीमियम.
संबंधित बातम्या :
- LIC IPO: एलआयसीचा आयपीओ हवा आहे? जाणून घ्या त्यासाठीच्या आवश्यक गोष्टी
- Post Office Scheme : पोस्ट ऑफीसची दाम्पत्यासाठी दरमहा 4,950 रुपये हमी उत्पन्न योजना, पैसा 100% सुरक्षित
- Senior Citizen Special FD Scheme : 'या' दिग्गज बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली खास FD योजना, जाणून घ्या किती मिळणार व्याजदर
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेणाऱ्यांना एलआयसीचा इश्यू स्वस्त मिळणार