Car Loan Offer : अवघ्या काही दिवसांनी दिवाळी (Diwali 2023) आहे. दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीमध्ये सोने खरेदी (Gold Shopping) सह वाहन खरेदी (Vehicle) ला देखील पसंती दिली जाते. 10 नोव्हेंबरला घनत्रयोदशी आहे. या दिवशी कार खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं. काही लोक कार खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक कर्जाची मदत देखील घेतात. तज्ज्ञांच्या मते, कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी बँकांच्या व्याज दरांची तुलना करणं आवश्यत आहे, यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हांला विविध बँकांच्या कार लोनबाबत माहिती देण्यात आहोत. एसबीआय (SBI), पीएनबी (PNB) आणि बँक ऑफ बडोदा (BoB) च्या व्याजदरांची तुलना करणार आहोत.


एसबीआय (SBI) 


देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये, कार कर्जावरील व्याज दर 8.65 टक्के ते 9.70 टक्के आहे. जर तुम्ही पाच वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर 10,294 ते 10,550 रुपयांचा हप्ता (EMI) भरावा लागेल. एसबीआयकडून कार कर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारलं जात नाही.


पीएनबी (PNB)


देशातील मोठ्या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँकेचं नाव समाविष्ट आहे. पीएनबीने कार कर्जावरील व्याजदर 8.75 टक्क्यांवरून 9.60 टक्क्यांवर वाढवला आहे. जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे हे कार लोन घेतले तर, तुम्हाला 10,319 रुपयांपासून 10,525 रुपयांपर्यंतचा हप्ता (EMI) भरावे लागतील. या कर्जावर देखील प्रक्रिया शुल्क शून्य आहे.


बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)


बँक ऑफ बडोदा ही देखील सरकारी बँक आहे. यामध्ये कार लोनवरील व्याजदर 8.70 टक्के ते 12.10 टक्के आहे. या व्याजदराने तुम्ही पाच लाख रुपयांचे कार कर्ज पाच वर्षांसाठी घेतल्यास, तुम्हाला 10,307 ते 11,148 रुपयांपर्यंतचा हप्ता (EMI) भरावे लागतील. येथे तुम्हाला 500 रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फी भरावी लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gold Silver Price Today : खूशखबर! सोने-चांदी झालं स्वस्त, दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा