Gold Silver Price Today : दिवाळी (Diwali 2023) च्या मुहूर्तावर सोने (Gold Price Today) - चांदी (Silver Price Today) खरेदी करणाऱ्यासाठी खूशखबर आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी, बुधवारी सोने-चांदी स्वस्त झाले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, बाजारात ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीच्या आधीच सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर घटताना दिसत आहेत.


सणासुदीच्या तोंडावर सोनं स्वस्त


आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 160 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुडरिटर्न्स वेबसाईट नुसार, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 61,200 रुपये आहे. मंगळवारी हा दर 61,360 रुपये होता. त्यासोबतच 22 कॅरेट सोनं 150 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 56,250 वरून 56,100 रुपयांवर पोहोचला आहे. 


चांदीच्या दरातही घसरण


सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 1000 रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर 74,500 रुपयांवरून 73,500 रुपयांवर पोहोचला आहे.


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 K Gold Rate Today)



  • मुंबई - मुंबईत सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 61360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Mumbai Gold Rate Today)

  • दिल्ली - 160 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 31350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. (Delhi Gold Rate Today)

  • कोलकाता - सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 61200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Kolkata Gold Rate Today)

  • चेन्नई - सोने 100 रुपयांनी स्वस्त होऊन 61750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Chennai Gold Rate Today)


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)



  • पुणे - 61200 रुपये 160 रुपयांनी स्वस्त (Pune Gold Rate)

  • नाशिक - 61230 रुपये 160 रुपयांनी स्वस्त (Nashik Gold Rate)

  • नागपूर - 61200 रुपये 160 रुपयांनी स्वस्त (Nagpur Gold Rate)

  • कोल्हापूर - 61360 रुपये 110 रुपयांनी स्वस्त (Kolhapur Gold Rate)


सोन्याची शुद्धता कशी तपासावी?


सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर कॅरेट मूल्य दाखवले जाते, जे त्याची शुद्धता दर्शवते. 24 कॅरेट सोने पूर्णपणे शुद्ध असते. कमी कॅरेट सोन्यात इतर धातूंचे मिश्रण असू शकते. तसेच, सोन्याचे प्रतिस्थापन मूल्य विशिष्ट गुरुत्व परीक्षक हे उपकरण वापरून निर्धारित केले जाऊ शकते. हे उपकरण सोन्याचे वजन आणि तुम्ही दिलेले वजन यांच्यातील गुणोत्तर मोजते, ज्यामुळे तुम्हाला शुद्धता तपासता येते. सोन्याच्या शुद्धतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही स्थानिक सुवर्ण महामंडळ किंवा प्रमाणित ज्वेलर्सचा सल्ला घेऊ शकता.