EPFO : जर तुम्ही देखील नोकरदार व्यक्ती असाल तर तुमच्या पगारातून (Salary) काही पैसे कापून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (Employees' Provident Fund Organisation) जमा केले जातात. पीएफ खात्यात (PF Account) पैसे जमा करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये, जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळण्यासोबतच, गुंतवणूकदाराला कोणतीही दुर्घटना घडल्यास विम्याची सुविधाही मिळते. अलीकडच्या काळात, ईपीएफओने क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया खूपच सोपी केली आहे. त्यामुळे तुम्हाला आपात्कालीन वेळी म्हणजेच गरजेच्या वेळी पैसे लवकर मिळू शकतात. पण, तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही सात लाख रुपयांचे पीएफ पैसे, पेन्शन आणि विमा गमावू शकता.


EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ने जाहीर केले आहे की, नामनिर्देशन (EPF Nomination) केल्याशिवाय तुमचे भविष्य निर्वाह निधी खातं चालू होणार नाही. ईपीएफओ (EPFO) खातेधारकांचे पेन्शन किंवा मृत्यूचे दावे सदस्याच्या खात्यात ई-नामांकन केल्यावरच निकाली काढले जातील. मात्र, गुंतवणूकदारांनी काळजी करू नये. डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ईपीएफओ खातेधारकांना अनेक सुविधा मिळत आहेत. खातेदार ऑनलाइन अर्ज भरू शकतात.


ईपीएफओ नॉमिनेशन करणे अनिवार्य


ईपीएफ (EPF) ही निवृत्तीसाठी चांगली गुंतवणूक योजना (Investment Plan) आहे. खातेधारकांना (Account Holder) पीएफओ नॉमिनेशन (EPFO Nomination) करणे अनिवार्य केले आहे, पण प्रक्रियेसाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, ईपीएफओने खातेधारकांसाठी (EPF Account Holder) लाभार्थींचे नामांकन (EPF Nomination)अनिवार्य केले होते. प्रक्रियेसाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. EPFO ने एक ई-नोंदणी (E-Registration) उपक्रम देखील सुरू केला. या उपक्रमुळे ईपीएफओ सदस्यांसाठी नॉमिनेशन करण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होण्यास मदत होईल.


EPFO मासिक पेन्शन कशी मोजली जाते? 


मासिक पेन्शन = ( पेन्शनपात्र वेतन x ईपीएस खात्यातील योगदान वर्ष ) / 70 


उदाहरण : एखाद्याचा मासिक पगार सरासरी 14 हजार असेल (यात बदल होतो, जो सरासरी केल्यावर सर्वात जास्त तो पकडायचा) आणि नोकरीचा कालावधी 20 वर्ष असेल तर दरमहा चार हजार रुपये पेन्शन मिळेल. 


दुसरं उदाहरण, जर कर्मचाऱ्याचा पेन्शनकरिता पात्र असलेला पगार 10 हजार रुपये इतका असेल आणि त्यांनी जर 18 वर्षे काम केलं तर (10,000 × 18) 70 = 2570 रुपये इतकं पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


EPFO : नवीन मोबाईल नंबर PF अकाऊंटसोबत लिंक करायचाय? सोपी पद्धत जाणून घ्या...