search
×

Pension Facility : आता घरबसल्या मिळणार पेन्शनसंबंधी सर्व माहिती, कार्यालयात चकरा मारण्याची कटकट होणार बंद 

Pension Facility : पेंन्शनधारकांसाठी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पेन्शनधारकांना आता पेंन्शन अर्ज भरण्यापासून ते पेन्शन खात्यावर जमा होईपर्यंतची सर्व माहिती घरबसल्या मिळणार आहे.

FOLLOW US: 
Share:

Pension Facility : पेन्शनधारकांना पेन्शनसंबंधी कोणतीही माहिती पाहिजे असेल, तर त्यासाठी आता पेन्शन कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. पेंन्शनधारकांसाठी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पेन्शनधारकांना आता पेंन्शन अर्ज भरण्यापासून ते पेन्शन खात्यावर जमा होईपर्यंतची सर्व माहिती घरबसल्या मिळणार आहे. दिल्ली सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

दिल्ली सरकार पेन्शनसंबंधीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन करत आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना आता पेन्शन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. जेष्ठ नागरिकांना आता डिजिटल स्वरूपात पेन्शन मिळणार आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकराच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार रोखण्यासही मदत होईल असे जाणकारांचे मत आहे.  

दिल्ली सरकारने राष्ट्रीय सामाजिक निवृत्ती वेतन योजना दिल्लीत लागू केली आहे. या योजनेअंतर्गत  दिल्लीत आता डिजिटलस्वरूपात लाभधारकांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. यासोबतच पेन्शनधारकांना सर्व सुविधा आता ऑनलाईन मिळणार आहेत. याची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध राहणार असून ही माहिती घरबलल्या पेन्शनधारकांना मिळणार आहे. पेन्शधारकांची रक्कम आता थेठ लाभधारकांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे भ्रष्टाचार थांबण्यास मदत होईल.

दिल्ली सरकारच्या या योजनेमुळे पेन्शधारकांना पेन्शन स्टेटस घरी बसून मोबईलच्या मदतीने चेक करता येणार आहे. याबरोबरच खात्यावर पेन्शन जमा झाली आहे की नाही हे पण घरबसल्या पाहता येणार आहे.

राष्ट्रीय सामाजिक निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून पेन्शनधारक नेट बँकिंग किंवा ज्या बँकेत लाभधारकाचे खाते आहे त्या बँकेच्या अॅपच्या मदतीने खात्यावर पेन्शनची रक्कम जमा झाली की नाही हे पाहता येणार आहे. याबरोबरच बँकेच्या ग्राहक सुविधा केंद्रात फोन करून एटीएम कार्डच्या मदतीने बॅंकेचे पासबुक अपडेट करता येणार आहे. त्यामुळे पैसे खात्यावर जामा झाले की नाही हे पाहणे शक्य होणार आहे.   

महत्वाच्या बातम्या

लहान मुलांनाही मिळतेय पेन्शन, EPFO नं सांगितलं कधीपर्यंत मिळणार आर्थिक मदत?

'भारत छोडो' चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीची व्यथा, तब्बल 56 वर्षे पेन्शन रोखली; राज्य सरकारवर हायकोर्टाचे ताशेरे

Published at : 09 Feb 2022 01:38 PM (IST) Tags: pension Pension holders   arvind kejriwal online pension 

आणखी महत्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

टॉप न्यूज़

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई