एक्स्प्लोर

PAN-Aadhaar Link deadline : पॅन-आधार लिंकिंगची मुदत आज संपणार, नुकसान टाळण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा

PAN-Aadhaar Link deadline : आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्क भरावा लागणार आहे.

PAN-Aadhaar Link deadline : जर तुम्ही देखील अजून तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्डला (Pan Card) लिंक केले नसेल तर आज ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे. उद्या म्हणजेच 1 जुलै 2023 पासून तुमचे पॅन कार्ड लिंक न केल्यास ते निष्क्रिय होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना अधिक वेळ मिळावा यासाठी ही मुदत वाढवली होती. आयकर नियमानुसार पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य आहे. ज्या व्यक्तींनी आतापर्यंत त्यांचे पॅन आणि आधार लिंक केलेले नाहीत ते 30 जूनपर्यंत तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्क भरावा लागणार आहे. 

पॅन-आधारच्या ऑनलाईन लिंकिंगमध्ये समस्या असल्यास ते NSDL आणि UTITSL च्या पॅन सेवा केंद्रावरून ऑफलाईन देखील केले जाऊ शकते. याचं कारण म्हणजे निशुल्क लिंकिंगची तारीख आधीच निघून गेली होती. त्यामुळे आज विलंब शुल्क भरून आधार पॅन लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड थेट निष्क्रिय होईल.

पॅन कार्ड-आधार कार्डला लिंक नसेल तर?

जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर सर्वप्रथम तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. तुम्ही निष्क्रिय पॅनद्वारे ITR दाखल करू शकणार नाही आणि तुमच्या प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया केली जाणार नाही. एवढेच नाही तर तुमचे प्रलंबित रिफंडही दिले जाणार नाहीत. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर प्रलंबित कार्यवाही पूर्ण केली जाऊ शकत नाही आणि तुमची कर कपात देखील ज्यादा दराने होईल.

पॅन-आधार ऑनलाईन कसे लिंक कराल?

  • ऑनलाईन लिंक करण्यासाठी https://incometaxindiaefiling.gov.in/ या लिंकला भेट देऊन आयकर ई-फायलिंग पोर्टल उघडा.
  • जर याआधी नोंदणी केली नसेल तर सर्वात आधी नोंदणी करा. तुमचा पॅन क्रमांक हा तुमचा आयडी असेल.
  • यानंतर User ID, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • या ठिकाणी तुम्हाला एक पॉप अप विंडो दिसेल, तिथे तुम्हाला आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले जाईल. जर पॉप अप विंडो आली नाही तर 'प्रोफाईल सेटिंग्ज' वर जा आणि 'लिंक आधार' वर क्लिक करा.
  • आता या ठिकाणी दिलेला तपशील तुमच्या आधार कार्डशी संबंधित जुळवा. जर हा तपशील जुळत नसेल, तर तुम्हाला चूक दुरुस्त करावी लागेल.
  • जर तपशील जुळत असतील, तर तुमचा आधार क्रमांक टाका आणि "link now" बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचं पॅन आधार कार्डशी लिंक झाला आहे याची खात्री देणारा एक पॉप-अप मेसेज दिसेल.
  • तुमचं पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ ला देखील भेट देऊ शकता.

एसएमएसद्वारे कसे लिंग कराल?

  • तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करा.
  • 12 अंकी आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक लिहा.
  • आता 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवा.

 

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
PM Modi on LPG: अमेरिका-इराण युद्धावेळी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 2000 रुपयांवर पोहोचले असते, संकटातून कसा मार्ग काढला, नरेंद्र मोदींनी सविस्तर सांगितलं... 
घरगुती गॅस सिलेंडरचे दर 2000 रुपयांवर पोहोचले असते, सरकारनं कसा मार्ग काढला? मोदी म्हणाले...

व्हिडीओ

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget