Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची एक चूक, संपूर्ण जगावर संकट, अमेरिकेत स्थिती गंभीर, जाणून घ्या काय घडणार?
OECD नुसार अमेरिकेत 2025 मध्ये महागाई दर 3.2 टक्के राहू शकतो. यापूर्वी तो अंदाज 2.8 टक्के होता तर वर्षाअखेरपर्यंत हा दर 4 टक्क्यांवर जाऊ शकतो.

न्यूयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांचं आयात शुल्काचं धोरण आणि जागतिक अनिश्चिततांमुळं अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वेगाला ब्रेक लागला आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना यांच्याकडून ताज्या रिपोर्टमध्ये अमेरिकेसोबत जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज घटवला आहे.
अमेरिकेचा विकास दर 2.2 टक्क्यांनी घटून 1.6 टक्क्यांवर
OECD नुसार अमेरिकेची अर्थव्यवस्था आता 2025 मध्ये केवळ 1.6 टक्क्यांनी वाढेल. मार्च 2025 च्या अंदाजानुसार तो 2.2 टक्के इतका होता. 2026 साठी हा दर घटून 1.5 टक्के करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार अमेरिकेतील व्यापारी धोरणातील अस्थिरता, स्थलांतराचे कठोर नियम, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येतील कपात आणि आयात शुल्काचा थेट परिणाम गुंतवणूक आणि क्रयशक्तीवर होऊ शकतो.
जागतिक विकास दर मंदावला
OECD नुसार जागतिक आर्थिक वृद्धी दर देखील कमी करण्यात आला आहे. 2025 आणि 2026 या दोन्ही वर्षांसाठी जागतिक विकास दर 2.9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जो पूर्वी 3.1 टक्के किंवा 3 टक्के होता. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या देशांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. इतर देशांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
आयात शुल्क धोरण आर्थिक अनिश्चततेचं कारण
रिपोर्टनुसार अमेरिकेत मे 2025 पासून नवे टॅरिफ लागू करण्यात आलेत यामुळं ग्राहक आणि उद्योग क्षेत्राच्या आत्मविश्वासावर परिणाम करत आहेत. अमेरिकेच्या कोर्टानं काही टॅरिफवर रोख लावला आहे.मात्र, ते पुन्हा लागू करण्यात आले. ट्रम्प यांनी स्टील आयातीवर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे.
ओईसीडीचे मुख्य अर्थतज्ज्ञ अल्वारो परेरा यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की जवळपास सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज घटवावा लागतोय कारणं व्यापार आणि धोरणासंदर्भातील अनिश्चितता ऐतिहासिक स्तरावर पोहोचलं आहे.
महागाई वाढणार
महागाईचं संकट देखील वाढलं आहे, ओईसीडीनुसार अमेरिकेतील महागाई दर 2025 मध्ये 3.2 टक्के राहू शकतो जो यापूर्वी 2.8 टक्के इतका करण्यात आला आहे. वर्षाच्या शेवटी हा दर 4 टक्क्यांवर जाऊ शकतो. टॅरिफच्या कारणामुळं वस्तूंचा खर्च वाढू शकतो. काही वस्तूंच्या किमती देखील घटू शकतात.
तंत्रज्ञान क्षेत्र आश्वासक
निराशाजनक आर्थिक स्थितीत तंत्रज्ञान क्षेत्राला संभाव्य सकारात्मक संकेत म्हणून पाहिलं जाऊ शकतं. ओईसीडीनुसार अमेरिकेत एआय, रोबोटिक्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग या सारख्या क्षेत्रात वेगानं प्रगती होत आहे. अल्वारो पररेगा यांच्या मते उत्पादनात वाढ पाहायला मिळू शकते. मात्र, हे आवश्यक आहे की जगातील देशांनी ट्रेड वॉर कमी करावं आणि गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवावा.























