Jio Institute in Navi Numbai : नीता अंबानींची मोठी घोषणा, नवी मुंबईत जिओ इन्स्टिट्यूट सुरु होणार, रिलायंसकडून 5 मिशन लॉन्च
Reliance AGM 2021 Jio Institute: रिलायंसच्या 44 व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. जिओ इंस्टिट्यूटसंदर्भात नीता अंबानी यांनी सांगितलं की, हे इन्स्टिट्यूट याचवर्षी सुरु होईल. या इंस्टिट्यूटची स्थापना नवी मुंबईत केली जात आहे.
Reliance AGM 2021 Jio Institute: रिलायंसच्या 44 व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. जिओ इंस्टिट्यूटसंदर्भात नीता अंबानी यांनी सांगितलं की, हे इंस्टिट्यूट याचवर्षी सुरु होईल. या इंस्टिट्यूटची स्थापना नवी मुंबईत केली जात आहे.
नीता अंबानी यांनी एजीएममध्ये म्हटलं की, आम्ही कोरोना काळात बालकांच्या संदर्भातील खेळांसंदर्भात काही नव्या गोष्टी सुरु केल्यात. आम्ही या माध्यमातून 2.15 कोटी मुलांपर्यंत पोहोचलो आहोत. नीता अंबानी म्हणाल्या की, देश आणि समाजाला मजबूत बनवायचं असेल तर महिला आणि मुलींना सशक्त बनवणं गरजेचं आहे. त्या म्हणाल्या की, व्यवसायासोबत समाजाला सशक्त बनवणे आमचं मिशन आहे. यासाठी रिलायंस फाउंडेशननं पाच महत्वाचे मिशन लॉन्च केले आहेत.
रिलायंसकडून पाच महत्वाचे मिशन लॉन्च केले आहेत. यात पहिलं मिशन ऑक्सिजन, दुसरं मिशन कोविड इंफ्रा, तिसरं मिशन अन्न सेवा, चौथं मिशन एम्प्लाई केअर आणि पाचवं मिशन वॅक्सीन सुरक्षा हे आहे, असं त्यांनी सांगितलं.
नीता अंबानी म्हणाल्या की, RILनं 2 आठवड्यांमध्ये प्रत्येक दिवशी 1100 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं आहे. देशात मेडिकल ऑक्सीजनचं 11 टक्के उत्पादन आरआयएल करत आहे. नीता अंबानी म्हणाल्या की, RIL नं रोज 15,000 कोरोना टेस्टिंग क्षमता तयार केली आहे. रिलायंस परिवार आम्हाला ताकत देतो हा विशाल परिवारचं आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे.
आपल्या भाषणात नीता अंबानी म्हणाल्या की, रिलायंसनं वॅक्सिनेशनचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. जिओ हेल्थ अॅपच्या मदतीनं आमचा मार्ग सुकर केला आहे. त्यांनी सांगितलं की, कोविड काळात आजपर्यंत आम्ही 7.5 कोटी गरजवंतांना जेवण दिलं आहे.