एक्स्प्लोर

Nirmala Sitharaman : 'रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवणार, तो आमचा निर्णय', केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अमेरिकेला प्रत्युत्तर

Nirmala Sitharaman : रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेनं भारतावर दबाव वाढवला आहे. अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. या दरम्यान निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य समोर आलंय.

Nirmala Sitharaman on buying Russian Oil नवी दिल्ली : अमेरिकेनं भारतानं रशियाकडून तेल खरेदी करु नये यासाठी दबाव वाढवला आहे. यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आणि 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादलं आहे. यामुळं भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ द्यावं लागेल. या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. निर्मला सीतारामन यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवेल, असं म्हटलं. आमचे ऊर्जा संसाधनांसदर्भातील निर्णय पूर्णपणे राष्ट्रहितावर आधारित आहेत, असं सीतारामन यांनी म्हटलं.

भारत रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवणार

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत निर्मला सीतारामन म्हणाल्या की भारत रशियाकडून तेल खरेदी करणं सुरु ठेवणार आहे. आम्हाला आपल्या आवश्यकता आणि गरजांनुसार निर्णय घ्यायचा आहे की तेल कोणाकडून खरेदी करायचं, हा निर्णय देशहित लक्षात ठेवून घेतला जाईल. निर्मला सीतारामन पुढं म्हणाल्या की गोष्ट रशियाकडून तेल खरेदी करणं असो की आणखी काही, आम्ही दर, वाहतूक आणि दुसऱ्या कोणत्या वस्तूंसदर्भातील निर्णय आपल्या गरजेनुसार घेतले जातील. तेल खरेदी विदेशी चलनाशी संबंधित असल्यानं आम्ही आमच्या सोयीनुसार आणि सुविधेनुसार निर्णय घेऊ, आम्ही कोणत्याही शंकेशिवाय रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवणार, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. भारत कच्च्या तेलाच्या आयातीवर सर्वाधिक खर्च करतो, असंही त्यांनी सांगितलं.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांनी यूक्रेन विरुद्धच्या युद्धाला पोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. भारत आणि चीननं रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली आहे. चीन हा रशियाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे तर भारताचा क्रमांक दुसरा आहे. यामुळं अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. येत्या काळात अतिरिक्त निर्बंध लादू असं देखील अमेरिकेनं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात अमेरिकेचं अध्यक्षपद दुसऱ्यांदा स्वीकारलं. त्यानंतर ट्रम्प यांनी रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर फेज-2 आणि फेज -3 टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती. चीननंतर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. भारत रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवणार असेल तर त्यांना दंड द्यावा लागेल, असं ट्रम्प म्हणाले होते. याबाबत निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की जीएसटी दरांमधील सुधारणांमुळं टॅरिफमुळं निर्माण झालेला दबाव कमी करण्यात फायदेशीर ठरेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
Embed widget