India Forex Reserve : एकीकडे टॅरिफचे टेन्शन, तर दुसरीकडे भारतासाठी गुड न्यूज, सरकारच्या तिजोरीत सोने आणि परकीय चलनाचा पाऊस
India Tariffs News : भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये (Forex Reserve) आणि सोन्याच्या राखीव साठ्यामध्ये (Gold Reserve) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली : भारतातील अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (Tariff) धोरणामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा परकीय मुद्रा भंडार (Forex Reserve of India) आणि सोने साठा (Gold Reserve) दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट 2025 ला संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय मुद्रा भंडार तब्बल 3.51 अब्ज डॉलर्सने वाढून 694.23 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. त्याआधीच्या आठवड्यात तो 690.72 अब्ज डॉलर्सवर घसरला होता.
फॉरेन करंसी अॅसेट्समध्ये (Foreign Currency Assets) वाढ
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, फॉरेन करंसी अॅसेट्स (FCA) म्हणजेच परकीय चलन आस्त्यांमध्येही वाढ झाली आहे. हा साठा 1.686 अब्ज डॉलर्सने वाढून 583.937 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. डॉलर व्यतिरिक्त युरो (Euro), पौंड (Pound) आणि येन (Yen) यांच्या चढउताराचाही त्यावर परिणाम झाला आहे.
देशाचा गोल्ड रिजर्व (Gold Reserve) वाढला
नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारताचा सोने साठाही वाढला आहे. तो 1.766 अब्ज डॉलर्सने वाढून 86.769 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. तसेच स्पेशल ड्रॉइंग राइट्स (Special Drawing Rights) 40 दशलक्ष डॉलर्सने वाढून 18.775 अब्ज डॉलर्स झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताची रिझर्व्ह पोझिशनदेखील वाढून 4.749 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
आरबीआयचा सोने खरेदीकडे कल
गेल्या काही महिन्यांपासून आरबीआय अमेरिकन ट्रेझरी बिल्सऐवजी सोन्याकडे (Gold Investment) जास्त भर देत आहे. 27 जून 2024 ला भारताकडे 840.76 मेट्रिक टन सोने होते, तर 27 जून 2025 पर्यंत ते 879.98 मेट्रिक टनांवर पोहोचले.
पाकिस्तानचाही फॉरेक्स रिजर्व (Pakistan Forex Reserve) वाढला
भारताबरोबरच पाकिस्तानाचाही विदेशी मुद्रा भंडार किंचित वाढला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) च्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट 2025 ला संपलेल्या आठवड्यात पाकिस्तानचा फॉरेक्स रिजर्व 41.7 दशलक्ष डॉलर्सने वाढून 19.65 अब्ज डॉलर्स झाला. त्यापैकी एसबीपीचा स्वतःचा भंडार 14.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचला.
ही बातमी वाचा:
























