एक्स्प्लोर

New Rules From 1st January 2023 : नव्या वर्षात बदलणार 'हे' नियम, लवकर आवरा महत्त्वाची कामं

New Rules From 1st January 2023: नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. लवकरच 2023 वर्षाला सुरुवात होईल. या नवीन वर्षात काही नियम बदलणार आहेत. याचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे. हे बदल कोणते ते जाणून घ्या.

New Rules From 1st January 2023 : 2022 वर्ष लवकरच संपणार आहे. नव्या वर्षाची चाहूल ( New Year 2023 ) लागली आहे. काही दिवसांनी 2023 वर्षाला सुरुवात होईल. 2022 मधील शेवटचा डिसेंबर महिनाही अर्धा संपला आहे. काही दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होईल. या नवीन वर्षात काही नियम बदलणार आहेत. या नियमांचा बदल तुमच्या खिशावरही पडणार आहे. नवीन वर्षात नव्याने लागू होणाऱ्या नियमांचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे. हे बदल कोणते ते जाणून घ्या.

क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल

2023 वर्षात क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट मिळतात. नवीन वर्षाआधी हे रिवॉर्ड पॉईंट रिडीम (Redeem) करुन घ्या. तसेच 1 जानेवारीपासून काही बँकांच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंटच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. असे रिवॉर्ड पॉईंट्स डिसेंबर महिन्यामध्येच वापरुन घ्या.

पॅन कार्ड आणि आधार लिंक करा (पॅन कार्ड आधार लिंक)

जर तुम्ही अजून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर हे काम लवकर पूर्ण करुन घ्या. आयकर विभागाने एप्रिल 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्याची मर्यादा वाढवली आहे, पण यामध्ये उशीर झाल्यास तुमच्या बँकिंग अडचणी येऊ शकतात.

विमा प्रीमियम महागण्याची शक्यता

2023 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम ( Insurance Premium ) महाग होण्याची शक्यता आहे. IRDAI वाहनांचा वापर आणि देखभाल यावर आधारित विमा प्रीमियमसाठी नवीन वर्षात नवीन नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात लोकांना महागड्या विमा हप्त्यांचा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करुन घ्या.

CNG आणि PNG च्या किंमती बदलण्याची शक्यता

नवीन वर्षामध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेचा इंधनाच्या नवीन किंमती जारी केल्या जातात. 2022 वर्षात नोव्हेंबर महिन्यामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला होता. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. नव्या वर्षी पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणते नवे दर जारी केले जातात हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
Gold Rate : सोने दरात घसरणीचा ट्रेंड कायम, दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी कमी होणार? खरेदीदारांना दिलासा मिळणार?
सोने दरात घसरणीचा ट्रेंड कायम, दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी कमी होणार? खरेदीदारांना दिलासा मिळणार?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sai Paranjpye Declines Presidency Of 100 Marathi Sahitya Sammelan: 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Embed widget