एक्स्प्लोर

LPG Rule Change : एक कुटुंब एक कनेक्शन, 1 जूनपासून एलपीजीचा नियम बदलणार, पीएनजीला प्रोत्साहन, नेमकं काय बदलणार? 

LPG New Rule: देशभरात पीएनजीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून पावलं उचलली जात आहेत. पीएनजी आणि एलपीजी कनेक्शन असल्यास संबंधित कुटुंबाचं एलपीजी कनेक्शन बंद होऊ शकतं. 

LPG New Rule नवी दिल्ली : देशभरात पीएनजी कनेक्शनची संख्या वाढत असली तरी एलपीजीचा वापर कमी झालेला नाही. केंद्र सरकारनं नागरिकांना एलपीजीला पर्याय असणाऱ्या पीएनजी गॅसचा वापर करावा असं आवाहन केलेलं आहे.  देशव्यापी मोहीम राबवल्यानंतर 6.5 लाख नव्या कनेक्शनच्या जोडण्या मार्च अखेर झाल्याची माहिती आहे. मात्र, मागणीमध्ये 18 टक्क्यांची घट झाली आहे. काही कुटुंबांकडून एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर बंद न करता पीएनजी कनेक्शन घेण्यात आल्याचं दिसून येतं.  केंद्र सरकारनं एलपीजी कनेक्शन आणि पीएनजी कनेक्शन कुटुंबाकडे असेल तर एलपीजी कनेक्शन सोडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, लोकांकडून एलपीजी कनेक्शन सोडलं जात नसल्याचं पाहायला मिळतंय. 

भारतात गेल्या दशकात एलपीजी वापरकर्त्यांची संख्या 33.5 कोटी इतकी झाली आहे.तर, पीएनजी कनेक्शन 1.64 कोटी आहे. या स्थितीत केंद्र सरकारला तातडीनं बदल करायचा आहे. 1 जूनपासून एलपीजी, पीएनजी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. 

एक कुटुंब एक कनेक्शन

नव्या दुरुस्तीनुसार ज्या कुटुंबाकडे पहिल्यापासून पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना त्यांच्याकडील एलपीजी कनेक्शन सोडावं लागेल. तेल पुरवठा कंपन्यांकडून  घरगुती सिलेंडरचा गैरवापर, साठेबाजी आणि काळाबाजार याला रोखण्यासाठी पीएनजी आणि एलपीजीचा एकाच वेळी वापर करणाऱ्यांचा शोध घेणं सुरु केलं आहे. नव्या दुरुस्तीनंतरएकाच पत्त्यावर एलपीजी आणि पीएनजी अशी दोन कनेक्शन ठेवता येणार नाहीत. ज्या ठिकाणी पीएनजीची सुविधा उपलब्ध असूनही निश्चित वेळेत एलपीजीवरुन स्विच न झाल्यास  निश्चित वेळेनंतर एलपीजीचा पुरवठा बंद केला जाऊ शकतो.

पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर पुढील 30 दिवसांमध्ये एलपीजी कनेक्शन बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. एलपीजी कनेक्शन बंद केल्यानंतर पुन्हा ते सुरु करण्याचा पर्याय उपलब्ध असेल मात्र, जिथं पीएनजी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसेल तिथं एलपीजी कनेक्शन घेता येईल. 

1 जूनपासून ज्या कुटुंबाकडे पीएनजी कनेक्शन आणि एलपीजी कनेक्शन उपलब्ध असेल त्यांना एलपीजी  सिलेंडर बुक करता येणार नाही. सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन आणि तेल पुरवठा कंपन्यांकडून त्यांचा डिजीटल डेटाबेस एकत्र केला जात आहे. 

पेट्रोलियम अँड नॅच्यूरल गॅस रेग्यूलटरी बोर्डानं सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनला पीएनजी जोडण्यांना गती देण्यास सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय पीएनजी मोहीम 2.0 येत्या 30 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

एलपीजी रिफील लॉक इन कालावधी शहरी भागांसाठी 21 दिवसांवरुन 25 दिवस करण्यात आला आहे. तर, ग्रामीण भागासाठी लॉक इन कालावधी 45 दिवस आहे. एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यातील तुटवडा कमी करणे आणि गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात कुटुंबांना 12 सिलेंडरवर सब्सिडी मिळते. अतिरिक्त सिलेंडरसाठी बाजारभावानुसार पैसे द्यावे लागतील. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Embed widget