एक्स्प्लोर

1st April : उद्यापासून सुरू होणार नवीन आर्थिक वर्ष; जाणून घ्या काय होणार स्वस्त अन् महाग

Changes from April 1 : उद्यापासून अर्थात एक एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे.या नव्या आर्थिक वर्षात नवीन नियम लागू होणार असून तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे.

Changes from April 1 : उद्यापासून अर्थात एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात काही नियमात बदल होणार आहे. याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवीन कर, तरतुदी उद्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेटही बिघडणार आहे. 

उद्यापासून नेमके काय होणार बदल? जाणून घ्या...

>> उद्यापासून नवी कर प्रणाली

- उद्यापासून नवी कर प्रणाली लागू होणार 
- नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठीची 7 लाखांची मर्यादा असणार आहे. याआधी 5 लाख इतकी मर्यादा होती. 
- अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा देण्यात आला. त्यानुसार नव्या कर प्रणालीत 50 हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनदेखील असणार आहे. म्हणजे 7.5 लाखपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होणार नाही. 

>> कार खरेदी महागणार

- एक एप्रिलपासून BS6 च्या फेस-2 एमिशन नॉर्म्स लागू होणार आहे. 
- एक एप्रिलपासून BS6-II कारची विक्री होणार आहे. 
- त्यामुळे मारुती, होंडा, हुंडाई, टाटासह अनेक कंपन्यांनी वाहनाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. 
- टाटा मोटर्सने आपल्या कमर्शियल वाहनांच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ केली आहे. 
-  BS6 च्या फेस-2 एमिशन नॉर्म्समुळे वाहनांच्या किंमतीत 50 हजारांपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे. 

>> ज्येष्ठ नागरिक बचत आणि योजनांमध्ये अधिक गुंतवणूक करता येणार

-  ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील.
- आतापर्यंत या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकत होते, या योजनेत वार्षिक 8 टक्के व्याज दिले जात आहे.
- याशिवाय ज्येष्ठ नागरिक आता मासिक उत्पन्न योजनेत जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील.
- जोडीदार देखील ही रक्कम जमा करू शकतो आणि संयुक्त खात्यात 15 लाख जमा करू शकतात. या योजनेत 7.1% वार्षिक व्याज मिळत आहे. 

>> जीवरक्षक औषधे आणि पेनकिलर्स महागणार

- पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे महाग होणार आहेत.
-  सरकारने औषध कंपन्यांना किमती वाढवण्याची परवानगी दिली आहे.
- घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदलांच्या आधारे किमती वाढणार आहेत.
- या औषधांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

>>  व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार

- रस्त्यावरील प्रदूषण आणि अपघात रोखण्यासाठी जुन्या वाहनांना रोखण्यासाठी सरकारकडून स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार आहे. 
-  स्क्रॅपिंग धोरणानुसार, 10 वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी खाजगी प्रवासी वाहनांना प्रदूषण आणि फिटनेस चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

>> सोने खरेदी महाग होईल

-  अर्थसंकल्पात, सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्क 20 टक्क्यांवरून 25 टक्के, चांदीवर 7.5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आले आहे. 
- यामुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढू शकतात.

>> प्रवास महागणार, टोल वाढणार 

NHAI ने टोलच्या दरात किमान 7 टक्क्यांनी वाढ केली आहे. टोलचे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. देशभरातील महामार्गावर प्रवास करणे महाग होणार आहे.

काय स्वस्त होणार?

• मोबाईल फोन
• इलेक्ट्रिक वाहने 
• टेलिव्हिजन संच
• बॅटरी
• कॅमेरा लेन्स
• कॅमेरा

काय महाग होणार

• चांदी
• पितळ
• सिगारेट
• सोने
• प्लॅटिनम
• आयात केलेले दरवाजे
• खेळणी
• सायकल
• इलेक्ट्रिक किचन चिमणी

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget