एक्स्प्लोर

23 मे रोजी 14 तासांसाठी NEFT मनी ट्रान्सफर सर्व्हिस बंद; RBIनं सांगितलं यामागचं कारण

एनईएफटीची सेवा 23 मे 2021 रोजी रात्री 12 वाजून एक मिनिटांपासून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेनं एक पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली. त्याचसोबत यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही 23 मे रोजी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणार असाल तर एकदा ही बातमी नक्की वाचा. भारतीय रिझर्व्ह बँक  (Reserve Bank Of India-RBI) ने एनईएफटी (NEFT) बाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. RBI  नं दिलेल्या सुचनेनुसार, एनईएफटीची सेवा 23 मे 2021 रोजी रात्री 12 वाजून एक मिनिटांपासून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. आरबीआयचं म्हणणं आहे की, एनईएफटीची प्रोसेस आणखी सुलभ करण्याच्या उद्देशानं एका दिवसासाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 

रिझर्व्ह बँकेनं एक पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली. त्याचसोबत यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. RBI ने म्हटलं की, NEFT सर्व्हिसची सेवेची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केलं जात आहे. हे अपग्रेडेशन 22 मे 2021 रोजीचं काम बंद झाल्यानंतर केलं जाईल. त्यामुळे 22 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी 23 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत NEFT सर्व्हिस उपलब्ध नसणार आहे. 

आरबीआयने असेही म्हटले आहे की सदस्य बँका रविवारी एनईएफटी सेवेमध्ये उद्भवलेल्या अडथळ्यानुसार त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या पेमेंट योजना बनविण्यास सांगू शकतात. एनईएफटी सदस्यांना एनईएफटी सिस्टमद्वारे अपडेट्स प्राप्त होतील. यावेळी आरटीजीएस (RTGS) सेवेवर परिणाम होणार नाही असेही केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

RTGS आणि NEFT साठी आता बँकेची गरज भासणार नाही 

दरम्यान, केंद्रीय बँक आरबीआयने आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या आर्थिक धोरणात (RBI Monetary Policy) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेद्वारे नॉन-बँक पेमेंट संस्थांसाठी संचालित केंद्रीय भरणा प्रणाली आरटीजीएस आणि एनईएफटी (NEFT) च्या सदस्यत्वासाठी परवानगी दिली आहे. आरबीआयच्या या प्रस्तावामुळे पीपीआय, कार्ड नेटवर्क, वाइड लेव्हल एटीएम ऑपरेटर यांसारख्या नॉन-बँक पेमेंट सिस्टम देखील मध्यवर्ती बँकेद्वारे संचालित आरटीजीएस आणि एनईएफटीचं सदस्यत्व घेऊ शकतील. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget