एक्स्प्लोर

तुमच्या पगाराच्या 'बजेट'मध्ये मुंबईत घर; 25,000 मासिक उत्पन्न, मग म्हाडाच्या लॉटरीत कुठे मिळेल 'ड्रीमहोम'

आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतील प्राईम लोकेशन्स म्हणून गणल्या जाणाऱ्या परिसरात परवडणाऱ्या दरात घर विकत घेण्याची संधी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात MHADA ने उपलब्ध करुन दिली आहे.

मुंबई: स्वप्नांची नगरी असलेल्या राजधानी मुंबईत घर म्हणजे दिवास्वप्नच झालं आहे. मुंबईतील (Mumbai) जागेचे गगनाला भिडलले भाव पाहता, तेथील घरांच्या किंमती देखील गगनचुंबी इमारतीसारख्याच वाढल्या आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर मुंबईचं घर झालं आहे. मात्र, शासनाकडून परवडणारी घरे देऊन सर्वसामान्यांना म्हाडा (Mhada), सिडकोच्या माध्यमातून लॉटरीद्वारे घरे देऊ शकते. त्यामध्ये, अत्यल्प उत्पन्न असलेल्यांनाही मुंबईत हक्काचं घर मिळवण्याची संधी मिळते. नुकतेच, मुंबईत मोक्याच्या ठिकाणी म्हाडाने 2030 घरांसाठी (Home) सोडत काढली आहे. या सोडतीत मुंबईकरांना, मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांना घर मिळविण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे, जर तुमचा पगार 25000 रुपये दरमहा असेल तर तुम्ही अत्यल्प घरात कॅटेगिरीत मोडता. म्हणजे, तुम्ही अत्यल्प गटातून घरासाठी अर्ज करु शकता. त्यामध्ये, तुमचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत मर्यादीत आहे. 
 
मुंबईत जमिनीला सोन्याचा भाव असल्यामुळे प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतील प्राईम लोकेशन्स म्हणून गणल्या जाणाऱ्या परिसरात परवडणाऱ्या दरात घर विकत घेण्याची संधी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात MHADA ने उपलब्ध करुन दिली आहे. म्हाडाने जाहीर केलेल्या लॉटरीनुसार, अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत.  या वर्गवारीमध्ये तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार अर्ज करु शकता.

तुमच्या पगारानुसार करा वर्गवारी

तुम्ही नोकरदार असाल आणि म्हाडाच्या या योजनेत सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या पगारानुसार, वार्षिक आर्थिक उत्पन्नानुसार तुम्हाला घर घेता येईल. 25 ते 50 हजार मासिक पगार असलेल्यांना अत्यल्प आणि अल्प गटातून अर्ज करता येणार आहे. तर, 50 हजारांपेक्षा जास्त ते 75000 एवढा पगार असलेल्यांना अल्प व मध्यम गटात अर्ज करता येईल. तर, 75 हजारांपेक्षा जास्त आणि 1 लाख रुपये पगार असलेल्यांना मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातून अर्ज करता येईल. तर, 1 लाखांपेक्षा जास्त पगार असलेल्या नोकरदारांना उच्च उत्पन्न गटातून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे, तुमच्या पगारीचा आकडा पाहून तुम्ही कोणत्या गटातून आपणास अर्ज करता येईल हे ठरू शकताय 
  
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम म्हाडाने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केला. शुक्रवारपासून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरता येणार आहेत. 13 सप्टेंबरला म्हाडाच्या या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाईल. म्हाडाच्या या लॉटरीत मुंबईतील तब्बल 2000 घरांचा समावेश असल्याने मुंबईकरांसाठी चांगली संधी चालून आली आहे.  https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर या लॉटरीबाबत सर्व माहिती जाणून घेता येईल.

म्हाडाची घरे मुंबईतील कोणत्या भागात?

म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत. मुंबई उपनगरातील  पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक  असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत.

दरम्यान, अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मात्र, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. त्यांना मध्यम, अल्प किंवा अत्यल्प गटातील घर विकत घेता येणार नाही. त्यामुळे, 25 ते 50 हजार पगार असलेल्यांना अल्प उत्पन्न गटातून घर मिळविण्यासाठी अर्ज करता येईल. 

म्हाडाच्या अर्जाची किंमत किती?
अर्ज शुल्क ₹ 500/- + जीएसटी @ 18% ₹90/- एकूण ₹ 590/- अर्ज शुल्क विना परतावा

अर्ज भरण्याची कार्यपद्धती

सर्वप्रथम म्हाडाच्या housing.mhada.gov.in किंवा mhada.gov.in या संकेतस्थळावर जावे येथे अथवा Mobile App - Mhada Housing Lottery System वर जावे. संकेतस्थळावर जाऊ अर्जदाराने सर्वप्रथम स्वतःची नाव नोंदणी करावी व सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. नाव नोंदणीसाठी अर्जदाराने, आवश्यक ती सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच बंधनकारक असलेली माहिती भरणे बंधनकारक आहे.  

अर्ज भरताना ही कागदपत्रे सोबत ठेवावीत

1. अर्जदार स्वतःचे व विवाहित असल्यास पती/पत्नी या दोघांचे आधारकार्ड, 

2. अर्जदार स्वतःचे पॅन कार्ड व विवाहित असल्यास पती/पत्नी दोघांचे पॅन कार्ड.

3. अर्जदार सध्या वास्तव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिन कोड क्रमांक नोंदणी करुन त्याची खात्री करणे आवश्यक आहे. पुढे मंडळाव्दारे होणारा पत्रव्यवहार याच पत्त्यावर केला जाईल. 

4. अर्जदाराचा आधारकार्डशी सलंग्न (Linked) स्वतःचा व विवाहित असल्यास पती/पत्नीचा भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile No.) व ई-मेल आय. डी. (E-mail ID)

5. अर्जदाराचे महाराष्ट्रातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domecile Certificate) (सन-2018 नंतरचे) 

6.  उत्पन्नाच्या स्तोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराने दिनांक 01/04/2023 ते 31/03/2024 (Assesment Year-2024-25) मधील आयकर विवरण पत्र अथवा दिनांक 01/04/2023 ते 31/03/2024 तहसिलदाराचा उत्पत्राचा दाखला.

7. आरक्षण प्रवर्गाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र ते उपलब्ध नसल्यास जातीचा दाखला.

8. इतर आरक्षित गटांसाठी निश्चित करुन देण्यात आलेले विहित नमून्यातील सक्षम प्राधिकान्याने साक्षांकित केलेले प्रमाणपत्र.

9. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशिलामध्ये बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, आयएफसी कोड, एमआयसीआर क्रमांक योग्य असल्याची व सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे. अनामत रक्कम भरण्यासाठी तसेच ही रक्कम परत करण्यासाठी याच बँक खात्याचा उपयोग केला जाईल. चुकीचे बँक तपशील दिल्यावर अनामत रक्कम परत करताना अडचणी आल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही.
 
अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशिल देऊन अर्ज करता येणार नाही. तसेच चालू खाते, संयूक्त खाते, एन.आर.आय. खात्याचा तपशील चालणार नाही. तसे केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. 

अर्जदारांच्या बँकेच्या शाखेचा MICR/IFSC क्रमांक टाईप केल्यानंतर सदर बँक व शाखेचे नाव आपोआप प्रदर्शित होत नसेल तर अर्जदाराने अन्य बँक खात्याची माहिती द्यावी. अथवा स्वतःच्या बँकेशी संपर्क साधावा.

ऑन लाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला पात्रतेनुसार वेगवेगळ्या संकेत क्रमांकासाठी अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील. 

ऑनलाईन अर्ज अर्ज करण्याची मुदत 08/08/2024 दुपारी 12.00 पासून ते 04/09/2024 रात्री 12.00 वाजेपर्यंत राहील.अर्ज करताना अर्जदार पात्र असलेल्या उत्पन्न गटाकरिता अर्ज करु शकतात.अनामत रक्कमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता (View) येऊ शकेल. अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करुन त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अनामत रक्कम भरण्याआधीच सर्व माहिती योग्य पद्धतीने काळजीपूर्वक भरावी.

हेही वाचा

बीडमध्ये सुपारी फेकणारे 8 जण ताब्यात; पोलीस अधीक्षकांना राज ठाकरेंचा सवाल, इंटेलिजन्स नाही का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shah Rukh Khan : 'या' नावडत्या बॉडी पार्टमुळे शाहरुख खानचं नशीब चमकलं, असा मिळाला बॉलिवूडमधील पहिला चित्रपट
'या' नावडत्या बॉडी पार्टमुळे शाहरुख खानचं नशीब चमकलं, असा मिळाला बॉलिवूडमधील पहिला चित्रपट
Jayant Patil : अजित पवार यांना मूळ स्वभाव दाखवण्यास बंदी, कन्सल्टंट सांगतील तसे बोलतात; जयंत पाटील यांचा टोला
अजित पवार यांना मूळ स्वभाव दाखवण्यास बंदी, कन्सल्टंट सांगतील तसे बोलतात; जयंत पाटील यांचा टोला
Thane Accident News : ठाण्यात भीषण अपघात, एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली, 11 प्रवासी जखमी
ठाण्यात भीषण अपघात, एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली, 11 प्रवासी जखमी
Ajit Pawar: अमित शाहांकडे तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीत का? अजित पवार एका वाक्यात म्हणाले...
अमित शाहांकडे तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीत का? अजित पवार एका वाक्यात म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines : 01 PM : 10 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaBappa Majha : उत्सवाचा राजा 'बाप्पा माझा' राज्यातील सर्वोत्तम देखावे.. सर्वोत्तम मूर्तीHeadlines : 12 PM : 10 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shah Rukh Khan : 'या' नावडत्या बॉडी पार्टमुळे शाहरुख खानचं नशीब चमकलं, असा मिळाला बॉलिवूडमधील पहिला चित्रपट
'या' नावडत्या बॉडी पार्टमुळे शाहरुख खानचं नशीब चमकलं, असा मिळाला बॉलिवूडमधील पहिला चित्रपट
Jayant Patil : अजित पवार यांना मूळ स्वभाव दाखवण्यास बंदी, कन्सल्टंट सांगतील तसे बोलतात; जयंत पाटील यांचा टोला
अजित पवार यांना मूळ स्वभाव दाखवण्यास बंदी, कन्सल्टंट सांगतील तसे बोलतात; जयंत पाटील यांचा टोला
Thane Accident News : ठाण्यात भीषण अपघात, एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली, 11 प्रवासी जखमी
ठाण्यात भीषण अपघात, एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली, 11 प्रवासी जखमी
Ajit Pawar: अमित शाहांकडे तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीत का? अजित पवार एका वाक्यात म्हणाले...
अमित शाहांकडे तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीत का? अजित पवार एका वाक्यात म्हणाले...
Ahmednagar News : पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या नगरच्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन कर्मचार्‍यांसह चार जणांवर गुन्हा दाखल
पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या नगरच्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन कर्मचार्‍यांसह चार जणांवर गुन्हा दाखल
Amitabh Bachchan Cryptic Post : ''सगळं काही संपून चाललंय...''; अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिग बींची पोस्ट, चाहत्यांची चिंता वाढली
''सगळं काही संपून चाललंय...''; अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिग बींची पोस्ट, चाहत्यांची चिंता वाढली
शेतकरी बांधवांनो वर्षाखेरीस शेतमालाचे भाव काय असणार? हमीभाव तरी मिळणार का? कृषी विभागाने सांगितलं...
शेतकरी बांधवांनो वर्षाखेरीस शेतमालाचे भाव काय असणार? हमीभाव तरी मिळणार का? कृषी विभागाने सांगितलं...
Manoj Jarange Patil: मोठी बातमी: मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार! 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार
मोठी बातमी: मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार! 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार
Embed widget