(Source: ECI/ABP News/ABP Majha)
luxury Flat : 1 नाही 2 नाही तब्बल 100 कोटींना विकला एक फ्लॅट, या फ्लॅटमध्ये विशेष काय?
सध्या घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका फ्लॅटची तब्बल 100 कोटी रुपयांनी विक्री झाली आहे.
luxury Flat : घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग ते स्वप्न छोटं किंवा मोठं नसतं. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणं घर खरेदी करत असतो. अलीकडच्या काळात घरांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरीसुद्धा लोक मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी करताना दिसत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका फ्लॅटची तब्बल 100 कोटी रुपयांनी विक्री झाली आहे. या फ्लॅटला एवढे पैसे देण्यामागचे कारण काय? या फ्लॅटमध्ये वेगळेपण काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिची जाणून घेऊयात.
डीएलएफ बिल्डर्सने विकसीत केलाय हा फ्लॅट
एक कोटी, दोन कोटी, पाच कोटी किंवा 10 कोटी की आणखी जास्त, तुम्ही एखादा आलिशान फ्लॅट घेण्यासाठी किती पैसे खर्च कराल. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एक फ्लॅट 100 कोटी रुपयांना विकला गेला आहे. या 100 कोटी रुपयांच्या या फ्लॅटच्या आजूबाजूला अरवलीचे हिरवेगार डोंगर आहेत. हा फ्लॅट डीएलएफ बिल्डर्सने विकसित केला आहे. हा फ्लॅट गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवरील 'द कॅमेलियस' सोसायटीमध्ये आहे.
4 महिन्यात मालमत्तेच्या किमती 40 टक्क्यांची वाढ
आलिशान मालमत्तेचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 4 महिन्यांत याच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी 10,000 स्क्वेअर फूट एवढ्या मोठ्या फ्लॅटसाठी बिल्डर्स 60 कोटी रुपये आकारत होते. पण गेल्या 4 महिन्यांत फ्लॅटच्या किंमती झपाट्यानं वाढल्या आहेत. सध्या 60 कोटी रुपयांना मिळणार फ्लॅट 100 कोटींना मिळत आहे. गोल्फ लिंक्स परिसरात तीन मोठे रियल्टी इस्टेट प्रकल्प आहेत. यामध्ये ‘मंगोलिया’, ‘अरालिया’ आणि ‘कॅमेलिया’ यांचा समावेश आहे.
उच्च अधिकारी आणि व्यावसायिकांची येथील घरांना पहिली पसंती
हे गोल्फ लिंक्स प्रकल्प स्टार्टअप कंपन्यांचे संस्थापक, MNC कंपन्यांचे उच्च अधिकारी आणि व्यावसायिक यांची पहिली पसंती बनले आहेत. गेल्या वर्षभरात या भागातील सर्वच प्रकल्पांमध्ये मालमत्तेच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. BoAt चे संस्थापक अमन गुप्ता, JC, Aakash Educational Service चे संस्थापक देखील Camellias मध्ये उपस्थित आहेत. चौधरीही तेथेच राहतात. सध्या, कॅमेलियसमधील घरे 85,000 रुपये प्रति चौरस फूट दराने विकली जात आहेत.
इंटिरिअरसाठी 15 कोटी रुपये खर्च
डीएलएफने हा फ्लॅट 85 कोटींना विकला होता. यानंतर त्यात इंटीरियर आणि इतर सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर त्याची किंमत जवळपास 100 कोटींवर पोहोचली आहे. अशाप्रकारे, हे आता देशातील सर्वात महागड्या घरांपैकी एक बनले आहे. विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये आजकाल अतिउच्च नेटवर्थ असलेले लोकही बंगल्यांऐवजी गेट सोसायट्यांमध्ये घरे घेण्यास प्राधान्य देत आहेत.
देशातील काही महागडी घरे
डी-मार्टचे मालक राधाकृष्ण दमाणी यांनी मुंबईतील मलबार हिलमध्ये 1001 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. त्याचप्रमाणे दीपिका रणवीरच्या वांद्रे येथील सी-व्ह्यू अपार्टमेंटची किंमत 119 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या: