एक्स्प्लोर

फक्त 24 तासातच LIC चा नवा विक्रम! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 

भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC ने मोठा विक्रम केला आहे. LIC ने गेल्या 24 तासात सर्वाधिक विमा पॉलिसी विकून आपल्या नावावर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

LIC Policy : भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC ने मोठा विक्रम केला आहे. LIC ने गेल्या 24 तासात सर्वाधिक विमा पॉलिसी विकून आपल्या नावावर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एलआयसीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) बनवला आहे. LIC  च्या एकूण 452839 एजंट्सनी 20 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात 5 लाख 88 हजार 107 जीवन विमा पॉलिसी विकून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने केली पडताळणी 

या ऐतिहासिक कामगिरीची पुष्टी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेच केली आहे. यासोबतच 20 जानेवारी 2025 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने एलआयच्या नेटवर्कच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. 20 जानेवारी रोजी, देशभरातील एकूण 452839 एलआयसी एजंट्सनी 588107 जीवन विमा पॉलिसी विकून हा विक्रम साध्य केला आहे. एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २४ तासाच्या आत, जीवन विमा उद्योगात एजंट उत्पादकतेसाठी एक नवीन जागतिक बेंचमार्क स्थापित झाला आहे. 

एजंट्सच्या समर्पणाचे, कौशल्याचे आणि अथक परिश्रमामुळं गौरव

LIC ने जारी केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती दिली आहे. हे आमच्या एजंट्सच्या समर्पणाचे, कौशल्याचे आणि अथक परिश्रमाच्या नीतिमत्तेचे एक शक्तिशाली प्रमाण असल्याची माहिती निवेदनात दिली आहे.  ही कामगिरी आमच्या ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महत्त्वाची आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या आमच्या ध्येयाप्रती आमची खोल वचनबद्धता दर्शवते. हा विक्रमी प्रयत्न एलआयसीचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ मोहंती यांच्या पुढाकाराचे परिणाम आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक एजंटला 20 जानेवारी 2025 रोजी 'मॅड मिलियन डे' रोजी किमान एक पॉलिसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. यावेळी बोलताना, मोहंती यांनी 'मॅड मिलियन डे' ऐतिहासिक बनवल्याबद्दल सर्व ग्राहक, एजंट आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

एलआयसी म्हणजे भारतीय जीवन विमा महामंडळ. जून 1956 मध्ये भारतीय जीवन विमा कायदा मंजूर झाल्यानंतर सप्टेंबर 1956 मध्ये तिने कॉर्पोरेट फर्म म्हणून आपले कामकाज सुरू केले. जुलै 1956 पासून एलआयसी कायदा लागू झाला. त्यामुळे भारतातील खाजगी विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण होण्यास मदत झाली. 154 जीवन विमा कंपन्या, 16 परदेशी कंपन्या आणि 75 भविष्य निर्वाह कंपन्या यांचे विलीनीकरण करून एलआयसी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ही भारतातील सर्वात मोठ्या वित्तीय संस्थांपैकी एक आहे. एलआयसीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! LIC चे डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनं पहिलं पाऊल, पॉलिसीधारकांसाठी लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म , काय होणार फायदे? 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget