एक्स्प्लोर

Jobs in India : मोठी बातमी! साडेतीन लाख नवीन नोकऱ्यांची योजना, बेरोजगार तरुणांना मोठी संधी

देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेशी ताळमेळ राखण्यासाठी विविध राज्यांमध्ये प्रयत्न केले जातायेत. अशातच कर्नाटक सरकारनं नवीन योजना आखली असून, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत.

Jobs in India : देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेशी ताळमेळ राखण्यासाठी विविध राज्यांमध्येही आपापल्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. भारताने 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था (Economy) होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश सारखी राज्ये 1 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहेत. या मालिकेत कर्नाटकनेही परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. याअंतर्गत राज्य परदेशी कंपन्यांना अनेक प्रकारची सूट देणार आहे. राज्यात सुमारे साडेतीन लाख रोजगारही निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.

ग्लोबल आउटसोर्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, फोर्ब्स 2000 कंपन्यांना विशेष सूट दिली जाणार आहे. राज्यात जागतिक क्षमता केंद्रांची संख्या दुप्पट करण्याचीही योजना आहे. जागतिक क्षमता केंद्रांची संख्या 1000 पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  कर्नाटक सरकारने जागतिक आउटसोर्सिंगला चालना देण्यासाठी भाड्याच्या खर्चाची प्रतिपूर्ती, पेटंट फीमध्ये मदत आणि विविध कर सूट देण्याची योजना आखली आहे. 2029 पर्यंत राज्यातील जागतिक क्षमता केंद्रांची (GCC) संख्या 1000 पर्यंत दुप्पट करण्याची त्याची योजना आहे. यामुळे लाखो नोकऱ्याही निर्माण होतील. या संदर्भातील धोरणाचा मसुदा शुक्रवारी लाँच करण्यात आला. सरकारला आशा आहे की या नवीन केंद्रांमधून सुमारे 50 अब्ज डॉलर्स मिळतील.

कर्नाटकमध्ये 2030 पर्यंत सर्व क्षेत्रात 10 लाख रोजगार निर्माण करणार

कर्नाटक राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री, डीके शिवकुमार यांनी सोशल मीडिया दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला फोर्ब्स 2000 कंपन्यांपैकी 15 टक्के कर्नाटकात आणायचे आहेत. आम्ही 2030 पर्यंत सर्व क्षेत्रात सुमारे 10 लाख रोजगार निर्माण करु असे ते म्हणाले. या योजनेमुळे कर्नाटक जागतिक टेक हब म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करेल. हे GCC त्यांच्या कंपन्यांना वित्त आणि संशोधन आणि विकासासाठी मदत करतील. सध्या देशात सुमारे 1700 GCC आहेत. या माध्यमातून सुमारे 19 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

जीसीसी कर्मचाऱ्यांची संख्या 28 लाखांपर्यंत पोहोचणार

आयटी इंडस्ट्री बॉडी नॅसकॉमच्या अलीकडील अहवालानुसार, 2030 पर्यंत देशात GCC ची संख्या सुमारे 2200 असू शकते. या माध्यमातून जवळपास 28 लाख लोकांना नोकऱ्याही दिल्या जाणार आहेत. भारतातील GCC ला बंगळुरु खूप आवडते. देशातील सुमारे एक तृतीयांश GCC या मेट्रो सिटीमध्ये आहेत. राज्य सरकार हे GCC बंगळुरू तसेच मंगळुरू, म्हैसूर आणि तुमकुरू येथे उघडण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Bank Job : परीक्षा न देता बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची अंतिम  तारीख किती?  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद आणखी चिघळणार?
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
बीडच्या शिक्षकाचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंचा प्रश्न, गृहमंत्र्यांचे उत्तर
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
रिषभ ते अजिंक्य, IPL टीमच्या कॅप्टनला किती पगार?
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Narayan Rane on Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Ajit Pawar on Ladki Bahin : लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार, मात्र योजना बंद करणार नाही : अजित पवार
लाडकी बहीण योजनेतून नावं कमी झाली, त्यांना दिलेल्या पैशांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले...
Embed widget