वॉशिंग्टन डीसी : जॉन्सन अँड जॉन्सन (Jonson And Jonson) या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. आमच्यावर अमेरिकेत दाखल करण्यात आलेले हजारो खटले निकाली काढण्यासाठी आम्ही 6.5 अब्ज डॉलर्स देण्यास तयार आहोत. आगामी 25 वर्षांत आम्ही ही रक्कम देऊ,  असं या कंपनीनं बुधवारी (1 एप्रिल) सांगितलं आहे. या कंपनीच्या टॅल्कबेस्ड उत्पादनांमुळे अंडाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) झाला आहे, असा तक्रारादांचा आरोप आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या प्रस्तावर तक्रारदारांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 


सर्व खटले निकाली काढण्याचा कंपनीचा निर्णय 


जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीविरोधात अमेरिकेत अनेकांनी तक्रार दाखल केलेली आहे. या कंपनीच्या टॅल्कबेस्ड वेगवेगळ्या प्रोडक्ट्समुळे आम्हाला अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा दावा, तक्रारदारांनी केला आहे. कित्येक वर्षांपासून या खटल्यांवर सुनावणी चालू आहे. त्यामुळेच हे सर्व खटले निकाली काढण्यासाठी या कंपनीने आता 6.5 अब्ज डॉलर्स देण्याची तयारी दाखवली आहे. आगामी 25 वर्षांत आम्ही हे पैसे देऊ, असा प्रस्ताव कंपनीने ठेवला आहे.


99 टक्के खटल्यांत अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा दावा


गेल्या अनेक दशकांपासून हे खटले चालू असल्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसलेला आहे. तसेच जनसंपर्काच्या दृष्टीनेही या कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आम्ही आमचे टॅल्क बेबी पावडरचे उत्पादन थांबवलेले आहे. यासह आमचे दुसरे टॅल्कबेस्ड उत्पादने वापरासाठी सुरक्षित आहेत, असे या कंपनीनचे म्हणणे आहे. या कंपनीविरोधात दाखल करण्यात आलेले साधारण 99 टक्के खटले हे अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा दावा करणारे आहेत.


दोन वेळा न्यायालयाने दिला नकार


एलटीएल मॅनेजमेंट ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची उपकंपनी आहे. याच उपकंपनीला दिवाळखोर घोषित करून तक्रारदारांना 6.5 अब्ज डॉलर्स देण्याचा विचार जॉन्सन अँड जॉन्स या कंपनीचा आहे. याआधी या कंपनीने असाच प्रयत्न दोन वेळा केलेला आहे. मात्र उपकंपनीला दिवाळखोर जाहीर करून हे खटले निकाली काढण्यास न्यायालयाने दोन्ही वेळा नकार दिलेला आहे. 


आमचा प्रस्ताव तक्रारदारांच्या हिताचा


या निर्णयावर कंपनीचे उपाध्यक्ष एरीक हास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं आम्ही दिलेला हा प्रस्ताव तक्रारदारांच्या हिताचा आहे. त्यामुळे दिवाळखोरीसंदर्भात निर्णय देणाऱ्या न्यायालयाने आमच्या या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं हास म्हणाले आहेत.  


हेही वाचा :


धक्कादायक! तब्बल 1.3 कोटी डी-मॅट खाते होल्डवर, गुंतवणूक करण्यास मज्जाव; नेमकं कारण काय?


'हे' पाच मिडकॅप फंड, ज्यांनी अनेकांना केलं लखपती, तीन वर्षांपूर्वी SIP करणारे आज मालामाल!


तुमच्या पीएफ खात्यात अजूनही व्याज जमा झालं नाही? कसं तपासायचं? जाणून घ्या सोप्या स्टेप्स!