एक्स्प्लोर

Jio Recharge : येत्या 1 डिसेंबरपासून तुमचा जिओचा रीचार्ज महागणार; खिशाला किती कात्री लागणार? 

Jio Recharge Hike : जिओने आपल्या रीचार्ज प्लॅनच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही किंमतवाढ येत्या 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे. 

मुंबई : भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियानंतर आता मुकेश अंबानींच्या मालकीच्या असणाऱ्या जिओने त्यांच्या टेलिकॉम कंपनीच्या रिचार्जच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिओचा रीचार्ज आता 20 टक्क्यांनी महागणार असून त्याची अंमलबजावणी येत्या 1 डिसेंबरपासून केली जाणार आहे. जिओच्या रीचार्ज महाग करण्याचा परिणाम हा देशातील जवळपास अर्ध्या मोबाईल यूजर्सवर होणार आहे. 

जिओ कंपनीच्या वतीनं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "येत्या काळात प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थाने चांगली डिजिटल सुविधा देण्यासाठी जिओने आपल्या रीचार्जच्या प्लॅनच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम इंन्डस्ट्रिजमधील सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी जिओ कटिबद्ध आहे. जगभरात सर्वात स्वस्त दरात आणि चांगल्या गुणवत्तेचे रीचार्ज प्लॅन्स देण्यासाठी जिओ नेहमी प्रयत्नशील आहे. याचा लाभ जिओच्या सर्व ग्राहकांना मिळेल."

जिओचा कोणता प्लॅन किती महाग झाला? 

  • जिओचा 28 दिवसांसाठी असणारा मासिक तीन जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 50 एसएमएस हा प्लॅन 75 रुपयांवरुन 91 रुपयांचा झाला आहे. 
  • जिओचा सर्वात महाग असलेला 365 दिवसांसाठीचा प्रति दिवस 2 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि प्रति दिवस 100 एसएमएस असणारा प्लॅन हा 2399 वरुन 2879 रुपयांचा झाला आहे. 

जिओचे हे नवीन प्लॅन 1 डिसेंबरपासून लागू असणार आहेत. त्या आधी गेल्या आठवड्यात व्होडाफोन-आयडीया आणि भारती एअरटेलने आपल्या रीचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget