एक्स्प्लोर

ITR फाइल करताना तुमच्याजवळ 'ही' कागदपत्रं तयार ठेवा, पगारदार व्यक्तीनं कोणता फॉर्म भरावा?

ITR Filing: इन्कम टॅक्स फाइल करणं प्रत्येक नागरिकाची कायदेशीर जबाबदारी असते. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

ITR Filing: सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं करदात्यांना आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. दरवर्षी आयटीआर फाइल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असते. या वर्षी मुदत वाढवून 15 सप्टेंबर करण्यात आली आहे. यामुळं करदात्यांना दिलासा मिळाला आहे.ज्यांच्या खात्यांच्या लेखापरिक्षणाची गरज नसते अशा वेतन मिळणाऱ्या कर्मचारी, पेन्शनर्स याशिवाय इतर लोकांना जुन्याच वेळेनुसार कर द्यावा लागेल. आयटीआर फाईल करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काही कागदपत्रं सोबत ठेवणं आवश्यक आहे. ज्यांचं पगारापासून मिळणारं उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना आयटीआर फॉर्म- 1 भरावा लागेल.

फॉर्म 16

आयटीआर फाईल करताना ज्या कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये महत्त्वाचं कागदपत्रं म्हणजे फॉर्म 16 आहे. फॉर्म 16 तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्यांच्याकडून दिला जातो. त्यामध्ये तुमचा एकूण पगार, टीडीएस किती कापला गेला आहे याची पूर्ण माहिती असते. या फॉर्मच्या मदतीनं तुम्ही टॅक्स पोर्टलवर भरलेली माहिती योग्य आहे की नाही याची पडताळणी करु शकता.  

फॉर्म 16A, 16B, 16C, आणि 16D

फॉर्म 16 A विमा कमिशन, मुदत ठेवीवरुन मिळणाऱ्या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर लागू होतो. जर एखादा व्यक्ती 50 लाख रुपयांपेक्षा अधिक स्थावर संपत्तीची खरेदी करतो त्यावेळी खरेदी करणाऱ्याला विक्रेत्याचा टीडीएस कपात करावा लागतो. हे फॉर्म QB मध्ये नोंदवावं लागतं.  यानंतर फॉर्म 16 B तयार होतो. याशिवाय जर महिन्याचं भाडं 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर भाडेकरु घरमालकाला फॉर्म 16 C देतो. भाडेकरुन टीडीएस कपात करणे आणि प्रमाणपत्र देण्यासाठी जबाबदार असतो. या प्रमाणपत्रातून वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून झालेल्या कमाईचा मार्ग कळतो आणि टॅक्स रिटर्न कोणत्याही चुकीशिवाय भरण्यात मदत होते.  

AIS, TIS आणि फॉर्म 26AS

हे तुमच्या कर रेकॉर्डच्या प्रमाणं असतं. फॉर्म 26AS मध्ये टीडीएस आणि टीसीएसची माहिती असते. AIS मध्ये बँकेकडून मिळालेलं व्याज, FD आणि शेअरच्या डिटेल्स असतात. जेव्हा TIS मध्ये AIS मध्ये दिलेल्या माहितीचा एक सारांश असतो. ही सर्व माहिती इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर उपलब्ध असते.  

कॅपिटल गेन स्टेटमेंट

जर तुम्ही तुमच्याकडील स्टॉक, म्युच्युअल फंड किंवा संपत्ती विकली असेल तर तुम्हाला कॅपिटल गेन्स संदर्भातील माहिती द्यावी लागेल. हे तुम्हाला ब्रोकर किंवा फंड हाऊसकडून मिळू शकेल.  

बँक स्टेटमेंट आणि इंटरेस्ट सर्टिफिकेट

बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजाचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. कारण व्याजाची नोंद आयटीआरमध्ये करणं आवश्यक असते. यामुळं तुम्ही एआयएस, फॉर्म 26 AS मधून सुटलेली माहिती नोंदवता येते.  

विदेशातील कमाई किंवा अनलिस्टेड शेअर

जर तुमच्याकडे विदेशातील कंपन्यांचे शेअर्स असतील किंवा तिथं तुमचं बँक खातं असेल तर त्याची माहिती द्यावी लागेल. जरी तुमचं हे उत्पन्न टोटल इन्कम एक्झम्पशन लिमिट पेक्षा कमी असलं तरी नोंदवावं लागतं. भारतीय कंपन्यांचे अनलिस्टेड शेअर असतील तर त्याबाबत माहिती द्यावी लागते. कंपनीचं नाव किंवा शेअरची माहिती द्यावी लागते.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget