IRDAI Business News : विमा नियामक IRDAI ने शुक्रवारी बँकिंग, वित्तीय आणि विमा क्षेत्रातील (BFSI) विमा कंपन्यांसाठी गुंतवणूक मर्यादा 25 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने एका परिपत्रकात या निर्णयाची माहिती दिली आहे की, विमा कंपन्यांना त्यांच्या कॉर्पसमधून चांगले परतावा मिळण्यासाठी अधिक लवचिकता वाढविण्याच्या उद्देशाने गुंतवणूक मर्यादा वाढवली जात आहे.


30 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी


या परिपत्रकानुसार, "प्राधिकरण सर्व विमा कंपन्यांना वित्तीय आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक मालमत्तेच्या 30 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी देते." यासह, मालमत्तेतील गुंतवणुकीची मर्यादा सुधारित करून 30 टक्के करण्यात आली आहे. निर्णयाचे स्वागत करताना, Zopper चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक गुप्ता म्हणाले, “आयआरडीएआयने अलीकडच्या काळात अनेक चांगली पावले उचलली आहेत. गुंतवणुकीच्या मालमत्तेच्या मर्यादेत झालेली वाढ ही एक चांगली बाब आहे, कारण यामुळे विमा कंपन्यांना त्यांच्या गुंतवणूक धोरणाला अनुकूल करण्यासाठी अधिक वाव मिळेल.”


विमा कंपनीच्या एकूण सुरक्षिततेलाही धोका नाही


सेक्योर नाऊचे सह-संस्थापक कपिल मेहता म्हणाले की, नियामकाच्या निर्णयामुळे विमा कंपन्यांना विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि दीर्घ मुदतीसाठी त्यांचा परतावा सुधारण्याची परवानगी मिळते. "गुंतवणुकीच्या मर्यादेवरील 30 टक्के निर्बंध स्वतःच अवाजवी नाहीत, त्यामुळे विमा कंपनीच्या एकूण सुरक्षिततेलाही धोका नाही," असे ते म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :