Reliance Industries Share Price and Market Cap: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीने इतिहास रचला आहे. बुधवारी रिलायन्स कंपनीचे बाजार मूल्य 19 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले. हा ऐतिहासिक टप्पा गाठणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर 20 रुपयांच्या घसरणीसह उघडला. मात्र, त्यानंतर शेअर बाजारात खरेदीचा जोर वाढला. रिलालन्सचा शेअर 2826 रुपयांवर पोहचला. या दरम्यानच रिलायन्स इंडस्ट्रीने 19 लाख कोटींच्या बाजार मूल्याचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली. मागील सात ट्रेडिंग सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे दिसून आले आहे. या सात ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये 11 टक्क्यांची उसळण दिसून आली. मार्च महिन्यापासून आतापर्यंत रिलायन्सचा शेअर 25 टक्क्यांनी वधारला आहे.
शेअर बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूर जीआरएममध्ये (ग्रॉस रिफायनिंग मार्जिन) विक्रमी उसळणीमुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म Jefferies ने रिलायन्सच्या शेअरची किंमत 3400 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. Jefferies नुसार, वर्ष 2021मध्ये रिलायन्सच्या शेअरने निफ्टीच्या तुलनेत कमी कामगिरी केली आहे. रिटेल आणि टेलिकॉम व्यवसायामुळे रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवसायात 36 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
( Disclaimer : ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी नेहमी आर्थिक सल्लागारांचा, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्यावतीने कोणालाही पैसे गुंतवण्याबाबत सल्ला दिला जात नाही )
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कमाईची संधी! महाराष्ट्रातील लहान मुलांच्या वस्तू विकणारी 'फर्स्ट क्राय' आणणार आयपीओ
- Elon Musk Twitter Deal : ट्विटरचं 'पाखरू' अखेर एलॉन मस्क यांच्या हाती; कराराबाबत 'या' 10 खास गोष्टी
- EPFO Update : EPFO ची पेन्शनधारकांसाठी नवी सुविधा; सोयीनुसार सादर करता येणार हयातीचा दाखला