Reserve Bank of India : देशात अनेक लोक सध्या कॅश पेमेंटच्याऐवजी नेट बँकिंग, चेक पेमेंटचा वापर करत आहेत. नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. पण चेक पेमेंटचा वापर करत असताना विशेष लक्ष द्यावे लागते. जर तुम्ही चेकचा वापर करून व्यवहार करत असाल तर रिजर्व बँक ऑफ इंडियानं नुकतीच पॉजिटिव्ह पेमेंट सिस्टमची माहिती लोकांना एक पोस्ट शेअर करून दिली आहे. एक व्हिडीओ शेअर करून चेक पेमेंट अधिक सुरक्षितपणे करण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) सांगितलं आहे. 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं आहे, 'हाय व्हाल्यू चेक पेमेंट करताय? तुमच्या बँकेच्या पॉझिटिव्ह पे सिस्टिममध्ये रजिस्ट्रेशन करा. त्यामुळे तुमचे चेक पेमेंट अधिक सुरक्षितपणे होईल.' आरबीआयनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन हे पॉझिटिव्ह पे सिस्टिमबद्दल माहिती देताना दिसत आहेत. 






काय आहे पॉझिटिव्ह पे सिस्टिम?
चेक द्वारे होणारे फ्रॉडचे प्रमाण कमी करण्यासाठी  पॉजिटिव्ह पेमेंट सिस्टमची सुरूवात करण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही चेक पेमेंट करता तेव्हा तुम्हाल तुमच्या चेकची सर्व माहिती बँकेला द्यावी लागतील. त्यानंतर बँक त्या चेकचे डिटेल्स मॅच करून बघेल. चेकवरील तारिख,  बेनेफिशियरीचे नाव, अकाऊंट नंबर इत्यादी माहिती बँकेला द्यावी लागेल. त्यामुळे तुमचे पेमेंट सुरक्षितपणे होईल. 


महत्त्वाच्या बातम्या :