मुंबई: जिओ 5G ची घोषणा केल्यानंतर आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच जिओचा आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची बातमी एका अहवालानुसार हाती आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्ससाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. कंपनीच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्योगपती मुकेश अंबानी याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


अंबानींच्या योजनेत त्यांची दूरसंचार फर्म रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (RJPL) आणि RIL उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) साठी स्वतंत्र आयपीओ समाविष्ट आहेत. हिंदू बिझनेस लाइनच्या अहवालानुसार, या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओच्या माध्यमातून अंबानी प्रत्येकी 50,000 कोटी ते 75,000 कोटी रुपयांची मोठी रक्कम उभारण्याचा विचार करतील.


जर हे आकडे गाठले गेले तर या दोन्ही सार्वजनिक ऑफर भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आयपीओ असतील. रिलायन्स जिओचा स्टॉक यूएस स्टॉक मार्केट Nasdaq वर देखील सूचीबद्ध केला जाऊ शकतो, जो टेक दिग्गजांसाठी जगातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे.


रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर रिलायन्स जिओचा आयपीओ लॉन्च केला जाऊ शकतो. हे डिसेंबर 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे.


आत्तापर्यंत, 2021 मधील Paytm IPO हा भारतातील रु. 18,300 कोटींचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. तर दुसरा सर्वात मोठा आयपीओ 2010 मध्ये कोल इंडियाचा ठरला होतो ज्याची रक्कम सुमारे 15,500 कोटी रुपये होती आणि तिसरा सर्वात मोठी रिलायन्स पॉवर 2008 मध्ये 11,700 कोटी रुपये आहे.


दरम्यान एलआयसी आयपीओ मागील सर्व विक्रमांना मागे टाकेल आणि देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी सार्वजनिक ऑफर बनेल अशी गुंतवणुकदार आणि तज्ज्ञांना अपेक्षा आहे. एलआयसी आयपीओ 4 मे रोजी उघडेल दरम्यान LIC आयपीओद्वारे सरकारला सुमारे 21,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.


महत्त्वाच्या बातम्या :