Surya Grahan 2022 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल म्हणजेच आज होणार आहे. ज्याचा भारतात परिणाम होणार नाही. म्हणजेच आपल्या देशात आपण ते पाहू शकणार नाही. हे सूर्यग्रहण आंशिक असेल, त्यामुळे सुतक कालावधी नसेल. जाणून घेऊ सविस्तर
भारतात कुठे दिसेल सुर्यग्रहण?
ज्योतिषशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या वेळेनुसार, सूर्यग्रहण शनिवारी 30 एप्रिलच्या अमावस्येच्या रात्री 12:16 पासून सुरू होईल आणि 1 मे रोजी पहाटे 4:8 पर्यंत राहील. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, नेरू, उरुग्वे, पॅराग्वे, उत्तर अंटार्क्टिका, दक्षिण पॅसिफिक समुद्र आणि दक्षिण अटलांटिक समुद्र इत्यादी ठिकाणी पाहता येईल. रात्री असल्याने ते भारतात दिसणार नाही. तसेच येथे कोणत्याही प्रकारच्या सुतक वगैरेचा परिणाम होणार नाही. भारताच्या वेळेनुसार, मध्यरात्री 12.15 पासून सुरू होईल आणि पहाटे 4:7 पर्यंत राहील. सूर्यग्रहण अर्धवट असल्याने केवळ 64 टक्के सूर्य चंद्राच्या सावलीने झाकलेला असेल.
आंशिक सूर्यग्रहण म्हणजे काय?
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवर सावली पडते आणि या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. परंतु जेव्हा चंद्र अर्धवट सूर्यप्रकाश झाकतो, म्हणजेच जेव्हा सूर्य चंद्रकोराच्या रूपात दिसतो, तेव्हा आंशिक सूर्यग्रहण होते. जेव्हा चंद्र त्याच्या सावलीचा फक्त बाह्य भाग सूर्यावर टाकतो तेव्हा त्याला उपछाया म्हणतात.
सूर्यग्रहण कुठे दिसणार?
-30 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात कुठेही दिसणार नाही. हे सूर्यग्रहण फक्त अंटार्क्टिका, अटलांटिक, पॅसिफिक महासागर, दक्षिण अमेरिका आणि पश्चिम दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे.
-सूर्यग्रहणाच्या वेळी या 10 गोष्टी लक्षात ठेवा
-सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
-सुतक काळात अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये.
-सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण, यावेळी मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात.
- ग्रहण काळात देवाचे ध्यान केले जाते.
-ग्रहण काळात मंदिरे उघडली जात नाहीत, त्यामुळे घरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तींना हात लावू नका.
-जर घरामध्ये मंदिर असेल तर ते ग्रहण काळात झाकले पाहिजे.
-ग्रहण संपल्यानंतरच मूर्तीसह संपूर्ण मंदिराची स्वच्छता करावी
-ज्योतिषी आणि पुरोहितांच्या मते, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये आणि त्यांनी ग्रहण पाहू नये.
-ग्रहण काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे देखील निषिद्ध आहे.
-ग्रहण काळात प्रवास करणे टाळावे.