प्रतिक्षा संपली, SEBI ची परवानगी मिळाली, कधीपर्यंत लॉन्च होणार बहुप्रतिक्षित Swiggy चा IPO; किती मोठा असेल?
SEBI Aproval For Swiggy IPO: SEBI नं Swiggy ला सांगितलं आहे की, IPO लाँच करण्यापूर्वी 21 दिवस आधी कागदपत्रं (UDRHP) अपडेट करावी लागतील. यासह, 2024 मध्ये आणखी एक मोठा IPO येणं जवळपास निश्चित आहे.
Swiggy Secures SEBI Aproval For IPO Launch : बाजार नियामक सेबीनं (SEBI) अखेर स्विगीच्या (Swiggy) आयपीओचा (IPO) मार्ग मोकळा केला आहे. सेबीनं मंगळवारी फूड डिलीवरी प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीला IPO साठी मान्यता दिली. कंपनीचा सुमारे 11 हजार कोटी रुपयांचा IPO नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो. SEBI नं Swiggy ला सांगितलं आहे की, IPO लाँच करण्यापूर्वी 21 दिवस आधी कागदपत्रं (UDRHP) अपडेट करावी लागतील. यासह, 2024 मध्ये आणखी एक मोठा IPO येणं जवळपास निश्चित आहे.
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म देणारी कंपनी स्विगी लवकरच शेअर बाजारात उतरणार आहे. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, स्विगीनं सेबीकडे एक ड्राफ्ट फाईल केला होता, त्याला मान्यता देण्यात आली आहे. आता लवकरच कंपनी आपला IPO आणणार आहे. या फूड डिलिव्हरी कंपनीचा आयपीओ यावर्षी लॉन्च होणार असल्याचंही बोललं जात आहे.
मनीकंट्रोलच्या हवाल्यानं बिझनेस टुडेवर एक वृत्त प्रकाशित करण्यात आलं होतं. त्या वृत्तानुसार, शेअर्सच्या विक्रीसाठी गोपनीय कागदपत्रं दाखल केल्यानंतर बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून मंजुरी मिळाली आहे. रिपोर्टमध्ये हेदेखील सांगितलं आहे की, अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, स्विगीचा इश्यू (Swiggy IPO) नोव्हेंबरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
रिपोर्टमध्ये पुढे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या मंजुरीनंतर गोपनीय कागदपत्रं दाखल करण्यासाठी या परवानगीअंतर्गत दोन अद्ययावत डीआरएचपी (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स) सादर केले जातील. एका DRHP मध्ये, SEBI च्या टिप्पण्यांना प्रतिसाद दिला जाईल, तर दुसऱ्यामध्ये, 21 दिवसांसाठी सार्वजनिक टिप्पण्या मागवल्या जातील. यानंतरच RHP (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल करून IPO लाँच केला जाईल.
किती मोठा असेल IPO?
बंगळुरूमध्ये असलेलं फूड डिलीव्हरी करणारा स्विगी प्लॅटफॉर्म आपल्या आयपीओमार्फत एक मोठा निधी एकत्र करण्याच्या तयारीत आहे. असं म्हटलं जात आहे की, ही कंपनी जवळपास 1 अरब डॉलर्सचा (8362 कोटी रुपये) फंड एकत्र करणार आहे. ही कंपनी लवकरच आपल्या आयपीओची इश्यू प्राईज, प्राईज बँड आणि इतर माहितीबाबत खुलासा करेल.
एप्रिलमध्ये शेअर होल्डर्सनी दिलेली मंजुरी
2014 मध्ये स्थापित, Swiggy ने तिच्या वेबसाइटनुसार, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात खाद्यपदार्थ वितरीत करण्यात मदत करण्यासाठी भारतभरातील 150,000 हून अधिक रेस्टॉरंट्सशी व्यवहार केले आहेत. स्विगी सुमारे 15 डॉलर अब्ज मूल्यांची मागणी करू शकते. एप्रिलमध्ये आयपीओ लाँच करण्यास भागधारकांची मंजुरी मिळाली होती.
5000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार
सूत्रांच्या हवाल्यानं मनी कंट्रोलनं आपल्या अहवालात म्हटलं आहे की, स्विगीनं गोपनीय मार्गानं IPO कागदपत्रं दाखल केली होती. या आयपीओची अंतिम तारीख अद्याप ठरलेली नाही, परंतु तो नोव्हेंबरमध्ये येईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. शेअर बाजारात विविध कंपन्यांच्या आयपीओच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्विगीला उशीर करायला आवडणार नाही. या IPO मध्ये, सुमारे 5000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्यासोबत, विक्रीसाठी एक मोठी ऑफर देखील असू शकते. या IPO द्वारे कंपनीला 15 डॉलर बिलियनचं मूल्यांकन साध्य करायचं आहे. कंपनीच्या भागधारकांनी एप्रिलमध्ये IPO लाँच करण्यास मान्यता दिली होती.