LIC IPO साठी प्रयत्न करताय? तुम्हाला मिळू शकतो 3 प्रकारच्या सवलतींचा फायदा
LIC IPO News Updates: एलआयसी आयपीओसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला तीन प्रकारच्या सवलतीचा फायदा मिळू शकतो.
LIC IPO News Updates: एलआयसी आयपीओ लाँच होण्यास काही दिवसच राहिले आहेत. येत्या 4 मे रोजी आयपीओ येणार असून 9 मेपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. तर, एलआयसी शेअर बाजारात 17 मे पर्यंत लिस्ट होण्याची शक्यता आहे. तुम्हालादेखील एलआयसी आयपीओसाठी तीन प्रकारच्या सवलतींचा लाभ मिळू शकतो.
LIC IPO मध्ये सवलत
LIC IPO मध्ये 902-949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे. पण तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक, कर्मचारी असाल तर तुम्हाला या किमतीवर ६० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. कंपनीने पॉलिसीधारकांसाठी प्रति शेअर 60 रुपये, कर्मचाऱ्यांसाठी 45-45 रुपये प्रति शेअर सवलत जाहीर केली आहे.
LIC IPO मध्ये तीन प्रकारच्या सवलती
तुम्ही LIC चे कर्मचारी असाल आणि तुमच्याकडे पॉलिसी असेल, तुम्ही रिटेल गुंतवणूकदार देखील असाल, तरी तुम्ही IPO मध्ये उपलब्ध असलेल्या तीन प्रकारच्या सवलतींचा फायदा मिळू शकतो. 'बिझनेस टुडे'च्या वृत्तानुसार, एलआयसीचे अध्यक्ष एम.आर. कुमार यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीला LIC IPO च्या सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अर्ज करावा लागेल.
या पॉलिसीधारकांना मिळणार सवलत
13 एप्रिल 2022 पर्यंत LIC कडून कोणतीही पॉलिसी खरेदी करणाऱ्या पॉलिसीधारकांना या IPO मध्ये सवलत मिळणार आहे. पॉलिसी मॅच्युअरटी, पॉलिसी सरेंडर अथवा पॉलिसीधारकाच्या मृत्यूमुळे संबंधित पॉलिसी एलआयसीच्या रेकॉर्डमधून वगळली नसेल, त्यांनादेखील ही सवलत मिळू शकते. त्याशिवाय एलआयसीने आपल्या एजंटसना पॉलिसीधारकांचे डीमॅट खाती उघडण्यास मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
LIC IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असणार आहे. सरकार कंपनीतील 3.5% हिस्सा विकून 21,000 कोटी रुपये उभारणार आहे. या IPO साठी LIC चे मूल्य 6 लाख कोटी रुपये आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
LIC Policy: तुमच्या मुलांसाठी उत्तम भविष्यासाठी या पॉलिसीत करू शकता गुंतवणूक!