LIC IPO Update: तुम्हीही LIC च्या IPO ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दीर्घकाळापासून गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आज आयपीओची तारीख जाहीर झाली आहे. असे बोलले जात आहे की, 4 मे रोजी कंपनी आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. IPO कोणत्या दिवशी ओपन होईल आणि तो बाजारात कधी लिस्ट होणार हे जाणून घेऊ.


LIC IPO शी संबंधित तपशील: 


27 एप्रिल - प्राइस बँड जाहीर केला जाऊ शकतो
29 एप्रिल - अँकर गुंतवणूकदारांसाठी वाटप
4 मे - IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल
9 मे - सदस्यत्वाची शेवटची तारीख
12 मे - इक्विटी शेअर्स डिपॉझिटरी खात्यांमध्ये जमा केले जाऊ शकतात
13 मे - मार्केटमध्ये लिस्टिंग होऊ शकते


किती शेअर्स होणार जारी 


या IPO च्या माध्यमातून कंपनी 22,13,75,000 शेअर जारी करेल.


इश्यूची किंमत किती असेल?


शेअर्सची इश्यू किंमत 950-1000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.


लॉटचा साइज किती असेल?


याशिवाय जर आपण लॉट साइजबद्दल बोललो तर LIC IPO च्या एका लॉटमध्ये 15 शेअर्स असू शकतात.


सरकार 21000 कोटी उभारणार 


सरकार या IPO द्वारे सुमारे 21000 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) मधील सुमारे 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा सरकारचा विचार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: