RBI Penalty on Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने आज पुन्हा एका बँकेला दंड ठोठावला आहे. जर तुमचे ही या बँकेत खाते असेल तर जाणून घ्या काय आहे प्रकरण आणि किती कोटींचा ठोठावला आहे दंड. आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रला दंड ठोठावला आहे. आरबीआयने सांगितले की, केवायसी आणि इतर सूचनांचे पालन न केल्याने हा दंड आकारला जात आहे.


1.12 कोटींचा दंड


आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रला (Bank of Maharashtra) 1.12 कोटींचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रला जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे, केवायसीशी संबंधित तरतुदी आणि बँकांद्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील कोडचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.


आरबीआयने जारी केले निवेदन 


आरबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, बँकेचे वैधानिक निरीक्षण आणि देखरेख मूल्यांकन (ISE) 31 मार्च 2020 रोजीच्या आर्थिक स्थितीनुसार करण्यात आले आहे. याशिवाय सीमाशुल्क सरकारच्या खात्यात जमा न केल्याबद्दलही चौकशी करण्यात आली आहे.


सेंट्रल बँकेलाही ठोठावण्यात आला दंड


ग्राहकांच्या हितसंबंधांच्या संरक्षणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 36 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 18 एप्रिल 2022 रोजीच्या या आदेशात, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हितसंबंधांच्या संरक्षणाशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल सेंट्रल बँकेला 36 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, बँकेवर नियामकांचे पालन होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: